For the last four five years farmers in Shivani and surrounding areas of Kinwat taluka have been selecting a large number of rabi crops.jpg 
नांदेड

शिवणी परिसरात धना पिकाने पांघरली पांढरी चादर; शुभ्र फुले व सुगंधाने दरवळला परिसर

विठ्ठल लिंगपुजे

शिवणी (नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरातील शेतकरी गेल्या चार-पाच वर्षापासून रब्बी पिकांच्या पेरणीमध्ये धना पिकांची निवड मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. या परिसरात गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवणी व परिसरात निसर्गाच्या अवकृपेमुळे खरिपाची पिके हातातून जात आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी कमी पाण्यात उत्पादनाचा खर्चही कमी प्रमाणात येत असल्याने धना पिकाकडे वळला आहे. धना पिकाला बाजारातही चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी जीवाची पर्वा न करता थंडी असतानाही आपल्या उरल्यासुरल्या या धना पिकाची वन्य प्राण्यांपासून बचाव करताना दिवस-रात्र एक करीत आहेत. अशातच गेल्या दोन आठवड्यापासून या भागात मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने धना पीक फुलोऱ्यात असताना या पडणाऱ्या धुक्यामुळे धना पिकाची फुले खरपून जातील.

या भीतीने शेतकऱ्यांना महागडी औषधीच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. शिवणी परिसरातील आप्पारावपेठ, मलकजांम कंचली, चिखली झऴकवाडी, तल्लारी, दयाल धानोरा, गोंडजेवली या गावतील शेतकरी गेल्या चार पाच वर्षापासून या पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेत आहेत. हे धान पिक विक्रीसाठी शिवणी किंवा धर्माबाद या बाजारपेठचा वापर करीत असतात.

यावर्षी या परिसरात हजारो एकरवर धना पिकाची पेरणी केल्यामुळे हा परिसर चोहीकडे कुठेही पाहिले तर पांढरी चादर पांघरून घेतल्यासारखे दिसत आहे. विशेष या धना पिकाला जंगली प्राणी किंवा पाळीव प्राण्या पासून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यात नाही पण रान डुक्कराकडून जमीन उकरून धना पिकाची नुकसान करण्याची भिती शेतकऱ्यामध्ये असल्याने धना पिकाचे बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT