file photo 
नांदेड

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु; विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच व्यावयासिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरु झाले आहे. महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ता. 31 मार्च 2021 आहे. जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अद्यापपर्यंत www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावेत. आवश्यक त्या कागदपत्रासह हे अर्ज आपल्या महाविद्यालयात सादर करावे. महाविद्यालयानी आपल्या महाविद्यालयातील सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना तात्काळ कळवावे. तसेच महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची अंतिम ता. 31 मार्च 2021 हा आहे.

सन 2019-20 व 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या महाविद्यालयातील प्रवेशीत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सदर विद्यार्थी पात्र असल्याची खात्री करुन सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी करुन पुढील कार्यवाही तात्काळ करावी. हे पात्र अर्ज कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयाच्या लॉगीनवर प्रलंबित ठेवू नयेत, असे झाल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहिल, असेही आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजश माळवदकर यांनी केले आहे.                              

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT