मुदखेड परिसरात बिबट्याचे दर्शन 
नांदेड

उसाच्या फडात बिबट्या; मुदखेड परिसरात भितीचे वातावरण

या घटनेचा व्हिडीओ व्हाट्सअप मीडियावर जिवंत बिबट्या उसाच्या फडात आढळून आल्याने परीसरातील नागरिकांमध्ये बिबट्या बाबतीत जोरदार चर्चा रंगली आहे.

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील सात नंबर कँनोल परिसरातील शिवारातील शेतकरी केशवराव किसनराव पाटील व्यवहारे यांच्या उसाच्या फडातील शेतामध्ये बिबट्या अचानक दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याला पकडून जंगलात सोडण्याची मागणी सरपंच शिवानंद पुयड, शेतकरी सूर्यभान व्यवहारे केशव पाटील यांनी यावेळी केली आहे.

रात्री वेळी शेतातील नांगरणी काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात येत असताना ट्रॅक्टर चालक प्रेम केदारे यांना नऊच्या सुमारास ट्रॅक्टरचा हेडलाईट समोर उसाच्या फडातून बिबट्या बाहेर येत असताना अचानक दिसला. त्याला पाहता क्षणी अरे बापरे वाघ असंच म्हणावे लागेल परंतु ट्रॅक्टरच्या फोकस मी पुन्हा बिबट्या अंग चोरुन घेत उसाच्या फडामध्ये मागच्या मागेच सरकला त्यामुळे पुढील घटना टळली आहे.

हेही वाचा - पाच जूनला निघणार मराठा आरक्षणासाठी मोर्चा

या घटनेचा व्हिडीओ व्हाट्सअप मीडियावर जिवंत बिबट्या उसाच्या फडात आढळून आल्याने परीसरातील नागरिकांमध्ये बिबट्या बाबतीत जोरदार चर्चा रंगली आहे.

या परिसरात बिबट्याने अनेक दिवसापासून बस्तान मांडून ठेवले असल्याने याठिकाणी अनेक घटना घडामोडी जनावराच्या शिकारी केलेल्या घटना घडल्या आहेत. तर आठ दिवसांपासुन हा बिबट्या परिसरातील शेतकऱ्यांना आढळून येते असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. शेतावर कामासाठी जाणाऱ्यांना भिती वाटत असल्याने कामाचा खोळंबा झाला आहे. तर आखाड्यावरील राहणाऱ्यांना या बाबत चिंता लागली आहे. तर शेतकऱ्यांचे शेतातील जनावरांवर हल्ला होईल ही भिती सतावत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT