file photo 
नांदेड

आपणच आपली होऊया दुर्गा- सहशिक्षिका अपर्णा जाधव लाडेकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आम्हा शिक्षकांसाठी शाळेची घंटा हीच प्रार्थनेची घंटा आणि विद्यार्थी हे दैवत. कोरोनामुळे मागील आठ महिन्यापासून आमची प्रार्थना थांबली आहे. आठवडयातील काही दिवस आम्ही शाळेत जावून शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे सुरु ठेवली आहेत. विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी आम्ही आता सारे काही शिकून घेतले आहे. ऑनलाईन वर्गामध्ये एखादी दुर्गा जेव्हा, ‘मॅडम शाळा केव्हा सुरु होते’ असा प्रश्न विचारते तेंव्हा गलबलून व्हायला होते. हा काळ आपणच आपली दुर्गा होण्याचा आहे, या शब्दात सहशिक्षिका अपर्णा जाधव यांनी आपल्या भावनांना वाहते केले. त्या येथील शिवाजी प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहे.  

आठवडयातील काही दिवस गर्दीतून वाट करीत शाळेत पोहचावे लागते. शाळेत असलेल्या 82 विद्यार्थी व विद्यार्थीनींशी संपर्कात असल्याशिवाय आमचे भागत नाही. काही विद्यार्थीनी घरी येण्याचा खूप हट्ट धरतात. शक्य तेंव्हा जमेल तसे त्यांच्या घरी जावून त्याची समजूतही काढावी लागते. त्यांच्याकडून दिलेल्या अभ्यासक्रमांची होमवर्कही पाहीले म्हणजे पुन्हा हे विद्यार्थी तेवढयाच जोमाने घरी बसून अभ्यासाकडे वळतात असा अनुभवही त्यांनी मोकळेपणाने सांगितला.

सर्वांच्या आरोग्याचा दृढ संकल्प जाहीर करीत त्या माझे 'कुटुंब माझी जबाबदरी'

माझ्या घरी छोटी मुलगी व परिवार आहे. सारे काही सर्वांची काळजी घेवून करावे लागते. शासनाने वेळोवेळी आरोग्याबाबतचे जे निर्देश दिले आहेत त्यांचे काटेकोर पालन आजवर आम्ही करत आलो आहोत. सतत मास्क चेहऱ्यावर ठेवणे, वेळोवेळी हात धुवणे, हात धुवायला जिथे जागा नसेल तिथे सॅनिटायझर वापरणे, कारण नसताना बाहेर न जाणे, सुरक्षित अंतर ठेवणे यामुळे आम्ही सर्व सुरक्षित झालो आहोत. माझे कुटूंब 82 विद्यार्थ्यांसह असल्याने माझी अधिक जबाबदारी असल्याचेही अपर्णा जाधव यांनी सांगून सर्वांच्या आरोग्याचा दृढ संकल्प जाहीर करीत त्या माझे 'कुटुंब माझी जबाबदरी'च्या त्या दूत झाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT