जिल्ह्यात पाच दुकाने निलंबीत 
नांदेड

पाच कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीतच; देगलूर, किनवटमध्ये भरारी पथकाची कारवाई

जिल्ह्यात खरिप हंगामादरम्यान बियाणे विक्री करताना कृषी निविष्ठा विक्री केंद्राकडून नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : जिल्हा तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाच्या तपासणीत खरिप हंगामादरम्यान बियाणे विक्री करताना अनियमितता आढळून आल्याने किनवट तालुक्यातील तीन तर देगलूर तालुक्यातील दोन अशा तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात खरिप हंगामादरम्यान बियाणे विक्री करताना कृषी निविष्ठा विक्री केंद्राकडून नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासोबतच अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे अधीक दराने विक्री होत असल्याच्याही तक्रारी होत्या. बियाणे विक्रेत्यांनी बियाणे कायदा १९६६ चे उल्लंघन केल्यामुळे जिल्हा तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाने पाच कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे परवाने निलंबीत केले आहेत. यात किनवट तालुक्यातील सारखणी येथील निलेश कृषी सेवा केंद्र व श्रीरामजी कृषी सेवा केंद्र तर किनवट येथील सेवादास कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे. दुसर्‍या कारवाईत देगलूर तालुक्यातील जिजाऊ कृषी सेवा केंद्र हाणेगाव व देगलूर येथील शिवकृपा कृषी सेवा केंद्राचा समावेश आहे.

हेही वाचा - कोरोना रुग्णांमध्ये आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे.

या कृषी सेवा केंद्राचा बियाणे साठा नमुना जुळून आला नव्हता. विक्री केलेल्या बियाणांचे कागदपत्र सादर न केल्यामुळे बियाणे विक्री परवाना निलंबीत करण्यात आला आल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्राने दिली. जिल्हास्तरीय पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक बी. बी. गिरी, मोहिम अधिकारी एन. जी. हुंडेकर यांचा समावेश होता. तर देगलूर तालुकास्तरीय पथकात तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील विडोळे यांचा समावेश होता. किनवट तालुकास्तरीय पथकात तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सकडून १६.३५ कोटी पगार; हार्दिकने गर्लफ्रेंडसाठी खरेदी केली कोट्यवधींची कार... भारतातील पहिलाच मॉडल

आई, बहीण अन् भाच्याचा गळा चिरला, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न; चिटफंडच्या कर्जाचा डोंगर अन् बहिणीच्या आजारपणामुळे टोकाचा निर्णय

Manchar Tax Dues: मंचर नगरपंचायतीची ४.८४ कोटींची कर थकबाकी; घरपट्टी–पाणीपट्टी न भरल्यास जप्ती व लिलावाची कारवाई

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

MPSC Agriculture Officers: अवसरी बुद्रुकच्या शेतकरी कुटुंबातील तेजश्री व अक्षय हिंगे दांपत्याची कृषी विभागात अधिकाऱ्यपदी चमकदार कामगिरी

SCROLL FOR NEXT