file photo 
नांदेड

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात- बालाजी चुकलवाड 

धोंडीबा बोरगावे

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : कंधार तालुक्यातील पानशेवडी व तळ्याचीवाडी परिसरातील ढाकु तांडा, खेमा तांडा, रामा तांडा यासह जवळपास सात ते आठ तांडा परिसरातील दोन हजार ५०० हेक्टरच्या जवळपास जळुन खाक झाली आहे. या आगीत शेतकऱ्यांचे प्रचंड 25 हजार कडबा जळुन खाक झाला आहे. या आगीत पशु प्राण्याचाही मृत्यू झाला आहे.

तसेच काही भागात शेतकऱ्यांचे अवजारे ही जळुन खाक झाले आहेत. नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी आपले कर्तव्य बजावत स्वतः गावकऱ्याच्या मदतीने आग विजवण्यात यश आले. पानशेवडी परिसरातील आग अजुन ही चालुच आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अग्नीशामक दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळाला आहे. तांड्यावरील लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिले आहेत. 

तर शेतकऱ्यांनी जनावरांसाठी ठेवलेला कडबा पुर्णपणे जळून गेला असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन त्वरीत आर्थिक मदत देऊन जनावरासाठी छावण्या उभारण्याची मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे कंधार तहसीलदार साहेबांकडे केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT