file photo 
नांदेड

लॉकडाउन : हातभट्टीला आले ‘अच्छे दिन’...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमध्ये शहरातील मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. जवळपास ५० दिवस उलटून गेल्याने तळीरामांच्या जीवाचा तिळपापड होत आहे. शेवटी काहीजण नशा तर काही हौसेपोटे मद्य (दारु) मिळत नसल्याने चक्क हातभट्टी गळी उतरविण्यासाठी तळीरामांचे पाऊले आता ग्रामिण भागाकडे वळले आहेत. त्यामुळे हातभट्टीला ‘अच्‍छे दिन’ आल्याचे बोलल्या जात आहे.  

कोरोना या महाभंयकर आजाराने सध्या जगातील काही महासत्ता देशांसह संबध जगाला विळखा घातला आहे. यात लाखोंचा बळी या आजाराने घेतला असून बळींच्या तीस पट नागरिकांना या आजाराची बाधा झाली आहे. या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संबंध जगभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. भारतातही तिसरा लॉकडाउन ता. १७ मेपर्यंत सुरू आहे. याकाळात गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच लॉकडाउन काळात अत्यावश्‍यक सेवेच्या दुकानाशिवाय अन्य आस्थापना बंद आहेत. त्यात मद्यांची सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांना मात्र चांगलाच या लॉकडाउनने घाम फोडला आहे. 

मद्याची दुकाने बंद केल्याने शासनालाही मोठा आर्थीक भुर्दंड 

मागील ५० दिवसापासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नियमीत मद्य सेवन करणाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे. मद्याची दुकाने बंद केल्याने शासनालाही मोठा आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दारु दुकानामुळे राज्यात सर्वाधीक महसुल मिळवून देणारा हा विभाग आहे. सुरवातीला काहीनी मद्याचा साठा करुन ठेवला होता. परंतु लॉकडाउन वाढत गेल्याने पदरमोड मद्य संपले. आता काय करायचे म्हणून चक्क तळीरामांचा मोर्चा हातभट्टीकडे वळला आहे. नशेची सवय जडलेल्या तळीरामांना कोसोदूर पायी जावून शरिराला घातक असलेली हातभट्टी, शिंदी असे मद्य गळी उतरावे लागत आहे.

हातभट्टीचे माहेरघर चिकाळा तांडा (ता.मुदखेड)

मात्र हातभट्टी व अवैध दारु विक्री करण्यांवर राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाकडून करडी नजर ठेवून कारवाई करण्यात येत आहे. हातभट्टीचे माहेरघर बनलेल्या चिकाळा तांडा (ता.मुदखेड) परिसरात दररोज छापा, तरीही रोज हातभट्टीची निर्मिती काही केल्या थांबत नसल्याचे दररोजच्या कारवाईवरुन दिसून येते. हातभट्टी कशीही असो ती आपल्या गळी उतरली पाहिजे यासाठी तळीराम चढ्या दराने ती घेण्यासाठी कोसो दूर पायी जात असल्याने हातभट्टीला अच्छे दिन आल्याचे बोलल्या जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT