File Photo 
नांदेड

लॉकडाउन ः नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एक हजारावर प्रसूती 

शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेक गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांनी तर अक्षरशः डिलेव्हरीच्या काळात काय होईल? याची धास्ती घेतली होती. रुग्णालयात वेळेवर जाता येईल का? लगेच डॉक्टर दाखल करुन घेतील का? अशा एक ना अनेक प्रश्नांनी त्यांना चिंता वाटत होती. परंतु डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मात्र तत्काळ आलेल्या रुग्णांची काळजी घेत लॉकडाउनमध्ये पावणे दोन हजारपेक्षा अधिक महिलांची सुलभ प्रसूती केली आहे.   

प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. एस. आर. वाकोडीकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कोरोनाचे संकट आल्यापासून गर्भवती महिलांना प्रसूती वार्डात घेण्यापूर्वी त्यांची आरोग्य चाचणी करण्यात येते. दरम्यान त्यांच्या संपर्कातील डॉक्टर्स, नर्स यांना विशेष सुरक्षा किट व आवश्यक त्या सर्व सुरक्षा प्रदान केल्या जात असल्याने एकही डॉक्टर्स आणि परिचारिकेच्या मनात गर्भवती महिलेची प्रसूती करण्याची भिती नसते. त्यामुळेच गेल्या सव्वा दोन महिण्याच्या काळात आम्ही एक हजार ८९० महिलांची सुलभ प्रसूती करु शकलो. 

अनेकांनी दोन महिण्यात एकदाही सुट्टी घेतली नाही

२३ मार्च ते सात जून या ७७ दिवसाच्या कालावधीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागाने केलेली ही कामगीरी बघुन सर्वत्र त्यांच्या कामाची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेक कर्मचारी हे वजिराबाद पुलावरील रस्ता बंद असलाना आणि पोलिसाकडून अडवणूक आणि अपमानास्पद वागणूक मिळत असतांना देखील दहा किलो मिटरचे अंतर ओलांडुन रुग्णालयात कर्तव्यावर हजर होत असत. अनेकांनी दोन महिण्यात एकदाही सुट्टी घेतली नाही. किंवा सुट्टीसाठी कारण शोधले नाही हे विशेष आहे. 

जोखिमेची शस्त्रक्रिया केली 

यामध्ये एक हजार २५५ गर्भवती महिलांची नैसर्गिक प्रसूती तर, ६३५ महिलांचे सिझेरियन झाले आहे. या शिवाय अतिशय जोखिमेच्या काळात रुग्णालयात दाखल झालेल्या १० महिलांची आपत्कालीन शस्त्रक्रिया देखील करण्यात प्रसूती विभागाला यश आल्याचे डॉ. वाकोडीकर यांनी सांगितले. 

एरवी शासकीय रुग्णालयाच्या नावाने खडे फोडणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र कोरोना काळात शासकीय रुग्णालय आणि डॉक्टरांचे खरे महत्व पटु लागले आहे. त्यामुळे लॉकडाउन काळात देखील शासकीय रुग्णालयातील गर्दी वाढत आहे. कोरोना काळात देखील त्यांना शासकीय रुग्णालय हेच एकमेव आधार वाटत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT