file photo 
नांदेड

लॉकडाऊनचा फटका :  एसटी बस नांदेड आगाराची आठ दिवसात कोट्यावधींची नुकसान

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ता. 25 मार्च पासून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी लाॅकडाऊन लावला आहे. याचा फटका बसून लाल परीचे चाके थांबले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड आगारातून 485 बसची वाहतूक गेल्या आठ दिवसापासून बंद असल्यामुळे चार कोटींपेक्षा अधिक महामंडळाला फटका बसला आहे. 

मागील काही वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ या ना त्या कारणाने वाहतूक बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गेले काही महिने राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्या काळात देखील महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. कालांतराने 50 टक्के प्रवासी क्षमतेने बस वाहतूक सुरु करण्यात आली. नफा होण्याऐवजी महामंडळाला प्रवासी वाहतुकीमध्ये तोटा सहन करावा लागला. काही दिवसानंतर वाहतूक सुरळीत झाल्यामुळे महामंडळाला चांगले दिवस आले होते.

परंतु पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. विविध उपाययोजना करुन रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न होत असताना मात्र यश आलेले नाही. वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य शासनाने यासंदर्भात जिल्हाधिकारी यांने निर्णय घेण्याचे आदेश दिले. नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढत आहे. गुरुवारपर्यंत बाधितांची संख्या 44 हजार वीस वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत रुग्णालयातून 32 हजार 653 रुग्णांना औषधोपचार यानंतर सुट्टी देण्यात आली आहे तर 820 रुग्णांचा मृत्यू झाला आहे जिल्ह्यामध्ये 10 हजार 300 19 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी 25 मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लावले आहे. आज मीतिला दोन एप्रिलॉपर्यंत गेल्या आठ दिवसांत एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे दररोज सरासरी पन्नास ते साठ लाख रुपये प्रमाणे चार कोटी रुपयांच्यावर आर्थिक नुकसान झाल्याचे महामंडळाच्या विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT