file photo 
नांदेड

खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावला- अशोक चव्हाण

प्रल्हाद कांबळे

नांदेड : देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे अकाली निधन धक्कादायक असून, त्यांच्या रुपात मी खांद्याला खांदा लावून काम करणारा सहकारी गमावल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

आमदार अंतापूरकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, मागील काही दिवसांपासून त्यांचे आजारपण वाढतच होते. अंतापूरकरांचे व्यक्तीमत्व संघर्षशील होते. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. अनेकदा खडतर परिस्थितींवर मात केली. कोरोनातूनही ते बरे झाले होते. या आजारपणातून ते बाहेर पडतील, अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घालून सर्वसामान्यांमधील एक लोकप्रिय नेतृत्व हिरावून घेतले.

आ. रावसाहेब अंतापूरकर एक मनमिळाऊ, संवेदनशील लोकप्रतिनिधी होते. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राजकारणात नवखे असताना देखील पहिल्याच प्रयत्नात त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आमदार असताना व नसतानाही त्यांनी प्रामाणिकपणे लोकांची कामे केली. त्यामुळेच जनतेने त्यांना दुसऱ्यांदा आमदार केले. ते अतिशय अभ्यासू होते. देगलूरच्या विकासासाठी त्यांच्या अनेक संकल्पना होत्या व त्याअनुषंगाने ते सतत प्रयत्नशील होते. 

त्यांच्या निधनाने केवळ देगलूर नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील एक सक्षम नेतृ्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. चव्हाण कुटुंबाशी त्यांचे संबंध राजकारणापलिकडचे होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने मी समाजकारणातील सहकारीच नव्हे तर एक कौटुंबिक स्नेही गमावल्याचे सांगून अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात! IT सेक्टर दबावात; कोणते शेअर्स घसरले?

Highest Paying Jobs 2026: आयटीऐवजी ‘या’ क्षेत्रांत तिपटीने वाढली भरती; धक्कादायक अहवालात समोर आली आकडेवारी

Gram Panchayat Resolution: ७ वाजता टीव्ही बंद; साेलापूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावानं घातला नवा आदर्श, ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव मंजूर!

'मराठी सिनेसृष्टीतील मी एकमेक अभिनेता...' प्रसाद ओकच्या नावावर दोन विश्वविक्रमांची नोंद, आनंद व्यक्त करत म्हणाला..'मला कधीच...'

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या; रंजना नागपूरकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण

SCROLL FOR NEXT