nnd25sgp15.jpg 
नांदेड

जमिनीच्या हक्कासाठी महामुक्काम आंदोलन

मिलिंद सर्पे


किनवट, (जि. नांदेड) : अखिल भारतीय किसान सभा, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष समिती किनवट व माहूरच्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी बुधवारपासून (ता.२५) उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात प्रचंड संख्येने आदिवासी सामील झाले आहेत. 


जमिनी बळकावण्याचे सत्र 
आदिवासींचे क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीपासून आदिवासींना जल, जंगल व जमिनीचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी सशस्त्र उठाव केला. स्वातंत्र्यानंतर माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमीनदार ग्रामीण भागातील सेठ सावकार यांनी जबरदस्तीने किंवा कवडीमोल किंमतीने भ्रष्ठ तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, दलाल चमचे यांच्या मदतीने आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व ३६ अनुसार आदिवासी खातेदारांच्या जमिनीचे कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणास कडक निर्बंध घालण्यात आलेले असताना सुद्धा किनवट माहूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे करण्याचे सत्र चालूच आहे. 

अतिक्रमण करून टिनाचे शेड उभे केले 
सारखणी (ता. किनवट) येथील सेवानिवृत्त तहसीलदार सीताराम रामजी कुडमेत्ते, डोणीकर यांचे वडील रामजी महादू कुडमेते डोणीकर यांना हैदराबाद कुळ कायदाप्रमाणे ३० एकर जमीन मिळाली होती. परंतु, सारखणी परिसरातील भूमाफियांनी बळजबरीने महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात जमिनीची लूट करून आलिशान बंगले उभे केले आहेत. या नंतर आदिवासी रमेश राठोड, निर्मला राठोड, मयूर रमेश राठोड यांनी बेकायदेशीर १५ ते २० लोकांचा जमाव करून कुडमेते, डोणीकर परिवाराला जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या देऊन अतिक्रमण करून टिनाचे शेड उभे केले आहेत.

अद्याप कारवाई झालेली नाही
सदर अतिक्रमणाबाबत तहसीलदार किनवट, पोलिस स्टेशन सिंदखेड यांना तक्रार दिली असता अद्याप कारवाई झालेली नाही. यावेळी विविध मागण्यांसाठी आदिवासी अधिकर राष्ट्रीय मंच व आदिवासी संघर्ष, किसान समिती व किसान सभा माहूर-किनवटच्या वतीने जमिनीच्या हक्कासाठी उपविभागीय कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे महामुक्काम आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभा राज्याध्यक्ष किसन गुजर, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे शंकर सिडाम, शेतकरी नेते अर्जुन आडे, आदिवासी संघर्ष समिती किनवट माहूरचे वसंत कुडमेते, गणपत मडावी, शेषेराव ढोले, दादाराव टारपे हे करत आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT