File photo 
नांदेड

नांदेड जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व, भाजपला दणका

शिवचरण वावळे

नांदेड ः कोरोनाचे सावट असताना देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निकाल रविवारी (ता.चार एप्रिल) हाती आले. यामध्ये कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना पक्षाच्या महाविकास आघाडीने जिल्हा बँकेवर दणदणीत विजय मिळवत वर्चस्व निर्माण केले आहे.
 
तहसिल कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनासमोरील हॉलमध्ये रविवारी (ता. चार) सकाळी आठ ते बारा दरम्यान मतमोजणीपूर्ण झाली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. २१ संचालकांपैकी तीन जागा आधीच बिनविरोध निवडून आल्याने १८ जागांसाठी शुक्रवारी (ता.दोन) मतदान झाले होते. रविवारी (ता.चार) मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीच्या पॅनलला यश मिळत होते. यामध्ये कॉग्रेस- १२, शिवसेना- एक, राष्ट्रवादी-चार तर भाजपच्या पॅनलला- चार जागेवर विजय मिळाला आहे. यापैकी कॉग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे बिनविरोध निवडणून आले आहेत. 

खासदार चिखलीकरांना दणका 
जिल्हा बॅंकेवर पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणजेच महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. गेल्यावेळी भाजपने कॉग्रेसला एकाकी पाडत जिल्हा बॅंकेची सत्ता मिळवली होती. परंतु, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना अशोक चव्हाण यांनी जिल्हा बॅंकेत परिवर्तन घडवल्याचे रविवारच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना चांगलाच दणका दिल्याने काॅंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

माजी मंत्री पराभूत 
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर यांचा नायगाव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून पराभव झाला. कुंटुरकर यांचे कालच (शनिवारी, ती. तीन एप्रिल) निधन झाले. रविवारी झालेल्या मतमोजणीत त्यांचा माजी आमदार वसंत चव्हाण यांनी 22 मतांनी पराभव केला आहे. 

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते  

  1. गोविंदराव शिंदे - १८ मते 
  2. बाबुराव कदम- २३ 
  3. प्रवीण पाटील चिखलीकर - १६ 
  4. प्रताप पाटील चिखलीकर - ४५ 
  5. भास्करराव पाटील चिखलीकर - बिनविरोध 
  6. वसंतराव चव्हाण - २८ 
  7. विजयसिंह देशमुख - ३४ 
  8. श्‍याम कदम- चार 
  9. नागेश पाटील आष्टीकर - बिनविरोध 
  10. बाळासाहेब पाटील - बिनविरोध 
  11. कैलास देशमुख - २५ 
  12. हनमंत पाटील - १७ 
  13. दिनकर दहिफळे- २६ 
  14. राजेंद्र केशवे- १३ 
  15. संगीता पावडे - ५३७ 
  16. विजया शिंदे - ५९० 
  17. शिवराम लुटे - १०५ 
  18. मोहन पाटील - १७८ 
  19. सविता मुसळे - ५६६ 
  20. हरिहर भोसीकर - ७०७ 
  21. व्यंकट जाळणे - ६३९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT