file photo 
नांदेड

माहूर गड : श्री दत्त शिखर संस्थान येथे गुरू पोर्णिमा 

सकाळ वृत्तसेवा

माहूर (जिल्हा नांदेड) : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज सरकारने राज्यातील सर्वच धार्मीक स्थळ भाविकांसाठी बंद केले आहेत. त्यात माहूर येथील रेणूकामाता मंदीर आणि माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान दर्शनासाठी बंद आहे. मात्र रविवारी (ता.पाच) संस्थानचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरू पोर्णिमा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे नेहमी गुरूपोर्णिमा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी केली जाते. पण यावर्षी कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे गडावरील सर्व मंदीर ता. १७ मार्चपासून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्यात आली आहेत. ती आजपर्यंत बंदच आहेत.

गुरू पोर्णिमेच्या महापुजेस प्रारंभ

रविवारी (ता. पाच) सकाळी सहा वाजता श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज यांनी गुरू पोर्णिमेच्या महापुजेस प्रारंभ केला. श्री भगवान दत्तप्रभुंची पुजा केल्यानंतर मंदीर परिसरातील समाधी व देवदेवतांची पुजा केली. महंत श्री मधुसुधनजी भारती महाराज हे पुजेनंतर परंपरागत महंताच्या गादीवर विराजमान झाले. त्यांचे पुजन पुजारी वासुदेव भारती महाराज यांनी केले. त्यानंतर महंतानी उपस्थितांना प्रसाद दिला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

यावेळी महापुरुष वासुदेव भारती महाराज, धनराज भारती महाराज, चिंतामन भारती महाराज, वामन भारती महाराज, हरीहर भारती महाराज, चिरंजीव भारती महाराज, संस्थानचे विश्वस्त गणेशराव पाटील, विश्वस्त धनंजय महाजन, विश्वस्त विश्वासराव माने, विश्वस्त गोपाल भारती, विश्वस्त अॅड. निलेश पावडे, विश्वस्त अॅड. आशिष देशमुख, व्यवस्थापक अॅड. सुदर्शन देशमुख यांच्यासह संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द

नांदेड जिल्ह्यातील माहूर गड हे अनेकांचे श्रध्दास्थान आहे. रेणूका मातेचे दर्शन घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संजय राठोड यांच्यासह आदी मंत्रीगण येथे दर्शनासाठी येतात. जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून रेणूका गडाकडे पाहिल्या जाते. निसर्गरम्य असे ठिकाण असून पर्यटनस्थळ सुद्धा आहे. या गडाच्या विकासासाठी शासन मोठा खर्च करते. नवरात्रमध्ये एक महिणा या ठिकाणी भाविकांची मांदीयाळी असते. जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास दीडशे किलोमिचटर अंततरावर असलेल्या माहूर देवस्थानाला राज्यासह तेलंगना, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून भाविक येतात. दत्त मंदीर आणि रेणूका मातेचे दर्शन घेतल्यानंतर मनशआंती मिळते असा अनेकांचा समज आहे. म्हणून या देवस्थानाला जागृत देवस्थान असे म्हणतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT