Mahur Ramgad Fort sakal
नांदेड

Mahur Ramgad Fort : माहूरच्या ‘रामगड’ किल्ल्याचे रूप पालटणार; १३ कोटी ८७ लाखांचा विकास आराखडा

माहूर किल्ला हा माहूर शहरापासून उत्तरेस साधारणपणे चार किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्यास ‘रामगड किल्ला’ असेही म्हणतात.

साजीद खान

माहूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे तसेच रेणुकामातेच्या वास्तव्याने पुनीत झालेले माहूरगड आणि रेणुकामातेच्या मंदिर परिसरातील देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधलेला रामगड किल्ला देखभाल दुरुस्तीअभावी पडझडीच्या मार्गावर होता.

विकास व संवर्धनाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने भरीव निधीची तरतूद करून ता. नऊ फेब्रुवारीपासून शासन परिपत्रकाद्वारे दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याने ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या रामगड किल्ल्याचा शिवकालीन किल्ल्यांच्या धर्तीवर विकास होणार आहे.

माहूर किल्ला हा माहूर शहरापासून उत्तरेस साधारणपणे चार किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्यास ‘रामगड किल्ला’ असेही म्हणतात. माहूर किल्ल्याची निर्मिती बहुधा राष्ट्रकुट काळात (इ.स. ९५१-९८२) मध्ये झाली असावी. पुढे हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडे आल्यानंतर त्यांनी किल्ल्याच्या आतील तटाचे बांधकाम केले.

यादवांच्या अस्तानंतर हा किल्ला काही काळ बहामनी सुलतानाच्या ताब्यात राहिला, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिणेकडे असलेला हा प्रांत व त्यातील माहूर किल्ला हा हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात गेला. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत हा किल्ला निजामाच्याच ताब्यात राहिला. वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये राज्यच्या वित्तमंत्र्यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली.

त्यानुषंगाने माहूर येथील रामगड किल्ल्याच्या विकासकामाकरिता नियुक्त वास्तुविशारद नंदादीप डिझायनर्स अॅण्ड व्हॅल्युअर, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून तयार करण्यात आलेले १३ कोटी ८७ लक्ष २३ हजार ५०६ रुपये इतक्या रकमेचे सविस्तर अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरिता सादर केले होते. राज्य शासनाने किल्ला जतन व दुरुस्तीच्या कामासाठी भरीव निधीची तरतूद करून प्रशासकीय मान्यता प्रदान केल्याने माहूरच्या रामगड किल्ल्याचे रूप पालटणार आहे.

यादवकालीन किल्ला ‘रामगड’

‘माहूरगड’ हे ठिकाण अत्यंत शोभिवंत आहे. माहूर गडावर ‘रामगड’ हा किल्ला वसलेला आहे. तो समुद्रसपाटीपासून सुमारे २६ फूट उंचीवर असून या किल्ल्याचे बांधकाम अत्यंत जुने आहे. या किल्ल्याला ‘गिरीदुर्ग’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. हा किल्ला यादवकालीन असल्याचे पुरावे इतिहासात आढळतात.

या किल्ल्याचा एकूण विस्तार जवळपास ९ किलोमीटर असून, हा किल्ला काही दिवस गोंड राजाच्या अधिपत्याखाली होता. ‘रामगड’ हा किल्ला मोगल, निजाम यांच्यादेखील अधिपत्याखाली काही दिवस राहिला. शेवटी या किल्ल्यावर मराठा साम्राज्याचेदेखील अधिपत्य असल्याची नोंद इतिहासात आढळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT