mohammad paigambar birth anniversary celebration Procession sakal
नांदेड

Mahur News : ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त मिरवणूक, माहूर तालुक्यामध्ये ईद उत्साहात साजरी!

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळीच मिरवणूक मुस्लिम बांधवांचा अभिनंदनिय निर्णय!

साजीद खान

माहूर (जिल्हा नांदेड) - प्रेषित मोहमद् पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच माहूर येथे आज गुरुवार रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात गौसिया मशीदीपासून झाली. शहराच्या प्रमुख मार्गावरुन फिरुन मिरवणूक सोनापिर दर्ग्यावर पोहोचली.

मिरवणुकीमध्ये कुठलेही वाद्य वाजवण्यात आले नाही. अतिशय शांततेत उत्सव पार पडला. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जशने मिलादून नबी मिरवणूक दिवसा काढून दुपारपर्यंत समारोप करण्यात आला.

नबी का दामन नही छोडेंगे, अशा घोषणा देण्यात आल्या, मिरवणुकीदरम्यान सरबत, व मिठाई वाटप करण्यात आली.

ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सजवलेल्या गाड्या, हिरव्या पताका, शुभेच्छा फलक घेऊन आबालवृद्धांसह मदरशांचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी होते. डोक्यावर पगडी, सदरा अशा पारंपरिक वेशात सहभागी मुस्लिम बांधवांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढली. यावेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली.

जुलूस-ए-मोहंमदी सकाळी ८.३० वाजता स्थनिक गौशिया मशीदीपासून झाली. तर समारोप दुपारी १२ वाजण्याच्या पूर्वीच सोनापिर दर्गाह येथे सलाम व दुवा चे पठन करून झाले. प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी हा यामागील उद्देश असल्याचे या वेळी तकरीर मधून धर्म गुरूंनी सांगितले ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलुस अत्यंत उत्साहात व शांततेत पार पडला.

देशात शांतता, सद्भाव व परस्पर धर्मात आपसी भाईचारा वृध्दिंगत व्हावा. यासाठी सामुहिक दुवा झाली.या वेळी पोलिस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आधिकार्यांनी या प्रसंगी समाज बांधवांशी संवाद साधला. माहूर चे प्रथम नागरिक नगर पंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी प्रशासनाचे आभार मानत सत्कार केला. या वेळी बहुसंख्येने सर्व समाज बांधव उपस्थित होते. या वेळी ए. पी. जी अब्दुल कलाम चौकात फलकाला पुष्प अर्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT