Zilla Parishad School Sakal
नांदेड

Zilla Parishad School : अखेर माहूर जिल्हा परिषद शाळेला दोन उर्दू शिक्षक मिळाले

माहुरला समाधान जाधव यांच्यासह मुस्लिम युवकांच्या पाठपुराव्याला यश

सकाळ वृत्तसेवा

माहूर : माहूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (उर्दू) व नवी आबादी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी मागील दोन वर्षापासून केली जात होती.

निवेदन पाठपुरावे करून वैफल्यग्रस्त झालेल्या माहूर येथील मुस्लिम युवकांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांची भेट घेऊन आंतरजिल्हा बदलीतून शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर (ता.एक) जुलै रोजी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतून माहूर व नवी आबादी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला दोन शिक्षक नव्याने उपलब्ध झाले आहे.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (उर्दू माध्यम) माहूर आणि शहरातील नवी आबादी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत मागील अनेक वर्षा पासून शिक्षकांची कमतरता होती, वर्ग एक ते चार अशी उर्दू माध्यमामध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षक संख्या कमी होती.

गावातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी व उज्वल भवितव्यासाठी या दोन्ही शाळेवर प्राधान्याने शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी मागील दोन वर्षापासून केली जात होती.

यासाठी शहरातील मुस्लिम युवकांनी अनेक वेळा जिल्हा परिषदेला निवेदने देखील दिली; परंतु येथील उर्दू शिक्षकांच्या जागा भरल्या जात नव्हत्या. या संदर्भात नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी व विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सय्यद अजीम,

सिराज रजा, शेख इरफान यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांची भेट घेऊन जिल्हा परिषद शाळेतील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना अवगत करण्याची विनंती केली.

त्यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व शिक्षण विभागाने मुस्लिम युवकांच्या निवेदनाची व समाधान जाधव यांच्या प्रभावी मागणीची दखल घेऊन (ता.एक) जुलै रोजी झालेल्या कौन्सिलिंग मध्ये अंतर जिल्हा बदलीतून आलेल्या शिक्षकांना माहूर तालुक्यात पदस्थापना देत नवी अबादी जिल्हा परिषद शाळेमध्ये सैय्यद मुजीब आणि केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये मोहंमद युनूस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एकंदरीत समाधान जाधव व माहूर शहरातील मुस्लिम युवकांच्या दोन वर्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा परिषद शाळा उर्दू माध्यमाला दोन शिक्षक उपलब्ध झाल्यामुळे जाधव यांचे आभार तर युवकांचे अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अरविंद केजरीवालांसह कुटुंबातील ५ जणांना निवडणूक आयोगाकडून नोटीस, कारण काय?

iPhone युजर्ससाठी WhatsAppचे खास गिफ्ट; मेसेज अन् चॅनेल अपडेट्स शोधणे होणार सोपे! पाहा नवे 'सर्च' फीचर...

Nagpur Crime: नागपुरात मकोका आरोपीचा रुग्णालयातून पलायन; मेडिकल कॉलेजच्या शौचालयाची खिडकी तोडून फरार

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Gangapur Crime: गंगापुरात वृद्ध शेतकऱ्याची दीड लाखांची रोख रक्कम लंपास; बँकेसमोरून हेल्मेटधारी चोरट्यांचा थरार

SCROLL FOR NEXT