file photo 
नांदेड

लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई : सचखंड एक्सप्रेसमधून 29 लाखाचा गुटखा जप्त

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड शहर हे मागील काही काळापासून गुटख्याचे माहेरघर बनत चालले आहे. शहरात शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात अनधीकृतपणे गुटखा तस्करी होत असते. अनेकवेळा अन्न व औषध प्रशासनाने संबंधीत गुटखा माफियांवर कारावई केली. मात्र त्यांच्यात काही बदल झाला नाही. आता तर चक्क गुटका माफियांनी रेल्वे गाड्यांचा वापर सुरू केला आहे. सचखंड एक्सप्रेसमधून पार्सलद्वारे आलेला २९ लाखाचा गुटखा लोहमार्ग पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. ही कारवाई नांदेड रेल्वेस्थानकावर गुरुवारी (ता. २२) रात्री करण्यात आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुटखा माफियांनी शक्कल लढवत चक्क रेल्वे गाडीचा वापर सुरुल केला आहे. मात्र त्यांच्यापुढे एक पाऊल असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी त्यांचे हे मनसुबे उधळून लावले. बाबा रत्ना, सुगंधित जर्दा आणि विदेशी सिगारेट जप्त केले आहेत.  सचखंड एक्सप्रेस ही नांदेडला येत असताना अज्ञात आरोपीने रेल्वेच्या पार्सलमध्ये २८ लाख ७९  हजार ८०० रुपयाचा बंदी असलेला गुटखा विविध बॉक्समध्ये पॅकिंग करून नांदेडला पाठविला. हा गुटखा पार्सलमधून येत असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.

२८ लाख ७९ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त 

श्री. गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठांना ही माहिती कळवून त्यांनी नांदेडच्या रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला. पार्सल मधून आलेला गुटखा हा रेल्वे प्रशासनालाही बुचकळ्यात टाकणारा ठरला. मात्र श्री गायकवाड यांनी शिताफीने आपले अधिकारी व कर्मचारी याठिकाणी पाठवून आलेल्या बॉक्सची तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार पुढे आला. पोलिसांनी २० लाख रुपये किंमतीचा रत्ना जर्दा नावाच्या गुटख्याचे ३० बॉक्स, सव्वापाच लाखाची सुगंधित तंबाखू १८ बॉक्स आणि लाखोची विदेशी सिगारेट असा २८ लाख ७९ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

यांनी घेतले परिश्रम

एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वेमधून येणारा गुटखा जप्त करण्याची लोहमार्ग पोलिसांची ही पहिलीच वेळ असावी असे बोलल्या जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी रेल्वेतून होत असताना रेल्वे प्रशासन गप्प कसे बसले. याबाबत संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम हे करत आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप भालेराव, जयद्रथ लांडगे, पोलिस नाईक जीवराज लव्हारे, धनराज काळे आणि श्री. कैकाडे यांनी परिश्रम घेतले. गुरूवारी (ता. २२) रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा व अन्य पदार्थ अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या स्वाधीन केल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT