अर्धापूर पोलिस ठाण्यासाठी फिल्डींग 
नांदेड

नांदेडातील अर्धापूरच्या मलाईदार ठाण्यासाठी अनेकजण उत्सुक

अर्धापूर पोलिस ठाणे जिल्ह्यात या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. या ठाण्याचा कारभारी होण्यासाठी नेहमी चढाओढ लागलेली असते. तसेच मोर्चे बंदोबस्त, राजकीय हस्तक्षेप आदी भानगडी कमी असतात.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : नांदेड शहरापासून पंधरा किलोमिटर अंतरावर व राज्य महामार्गावर असलेल्या अर्धापूर पोलिस ठाण्याचा कारभारी होण्यासाठी अनेक पोलिस निरीक्षक उत्सुक असून आपल्या परीने फिल्डींग लावत आहेत. हे ठाणे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातील आसल्यामुळे त्यांच्या मर्जीनेच पोलिस निरिक्षकाला अर्धापूरसारखे मलाईदार पोलिस ठाणे मिळणार आसल्याची चर्चा शहरात आहे. नविन येणा-या अधिका-याला शहरासह तालुक्यातील अवैध धंदे, मटका, अवैध सावकारी, देशी दारु विक्री, गुटखा विक्री या सारख्या अवैध धंद्यावर आळा घालावा लागणार आहे.या धंद्याला असलेला राजाश्रय तोडून पोलिस प्रशासनाची वचक निर्माण करावी लागणार आहे.

अर्धापूर पोलिस ठाणे जिल्ह्यात या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. या ठाण्याचा कारभारी होण्यासाठी नेहमी चढाओढ लागलेली असते. तसेच मोर्चे बंदोबस्त, राजकीय हस्तक्षेप आदी भानगडी कमी असतात. तसेच एक मलाईदार पोलिस ठाणे म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जो पालकमंत्री व पोलिस अधिक्षकांचा विश्वास संपादन करेल त्यालाच हे ठाणे मिळणार आहे.

हेही वाचा - कुरुळा दूरक्षेत्र पोलिस चौकीचा लाचखोर सहाय्यक फौजदार सुभाष चोपडे याच्यासह एका खासगी व्यक्ती लाचेच्या जाळ्यात.

अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांचा कार्यकाल संपत आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध वाशिम पोलिस ठाण्यात गंभीर प्रकरणाता गुन्हा दाखल झाला असल्यामुळे बदली किंवा प्रशासकीय कारवाई होवू शकते. त्यामुळे अर्धापूर पोलिस ठाण्याचा कारभार आपल्यालाच मिळावा यासाठी तीन ते चार पोलिस निरीक्षक मोर्चे बांधणी करित आसल्याची चर्चा आहे. पोलिस ठाण्याचा सध्या प्रभार आर. टी. नांदगावकर यांच्याकडे आहे. या ठाण्याचा नविन कारभारी कोण हे येत्या काही दिवसात कळणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT