Maratha Reservation Esakal
नांदेड

Maratha Reservation: नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या; 24 तासात दोन आत्महत्या

नांदेडमधील एका विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणाच्या मुद्दा राज्यात पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाज एकत्रित आला आहे. मराठा आंदोलकांकडून मराठा आरक्षणाची मागणी आणखी तीव्र होत आहे. तर मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यावर विचार करण्यासाठी सरकारला दिलेला वेळ संपत आला आहे. एकीकडे, मनोज जरांगे यांनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरुच आहेच.

नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट देखील सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे.

भोपाळ (ता.नायगाव) येथील ओमकार आनंदराव बावणे (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओमकारने रविवारी (22 ऑक्टोबर) सायंकाळी गावाशेजारील जंगली पीरजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. दरम्यान, मृत्यूपूर्वी ओमकारने विहिरीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

विहिरीवर लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये 'माझे आई वडिल मोलमजुरी करून आम्हाला शिक्षण शिकवत होते. पण त्यांची परिस्थिती मला पाहवत नव्हती म्हणून आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी विहिरीत उडी मारून जीव देत आहे,' असा सुसाईड नोटमध्ये लिहले आहे. काल एकाच दिवशी नांदेड जिल्ह्यात दोघांनी आत्महत्या केली आहे. या घटनांमुळे समाजातून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या घटनांमुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. यासंबधीचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

रविवारी झाली होती एक आत्महत्या

काल (रविवारी) नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करुन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. तरुणाच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट देखील सापडली होती. नांदेडमधील हदगांव तालुक्यातील वडगाव इथल्या शुभम सदाशिव पवार या तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे. शुभमनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती.

टोकाचं पाऊल न उचलण्याचे मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

टोकाचं पाऊल न उचलण्याचे आवाहन माराठा समाजाच्या आंदोलकांना मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT