file photo 
नांदेड

विवाहितेचा मृत्यू ; सासरच्या तिघांना दहा वर्षाची शिक्षा- भोकर न्यायालयाचा निकाल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी भोकर येथील जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सोमवारी (ता. २२) सासरच्या तिघांना दहा वर्ष शिक्षा व प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची  शिक्षा सुनावली. 

तू काळी आहेस, आम्हाला पसंत नाहीस असे म्हणून माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहीत महिलेचा छळ करुन जिवे मारणाऱ्या सासरच्या तिघांना दहा वर्षाची शिक्षा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सोमवारी सुनावली. फिर्यादी माधव व्‍यंकटी डोंगरे राहणार दरेगाववाडी तालुका मुदखेड यांची बहीण सविता हिचा विवाह वडगाव तालुका हिमायतनगर येथील दत्ता आनंद तुपेकर याच्याशी ता. 9 मे 2016 रोजी झाला होता. लग्नानंतर सासू, सासरा व नणंद यांनी तू काळी आहेस, आम्हाला पसंत नाहीस म्हणून त्रास देणे सुरु केले. 

एवढेच नाही तर दुचाकी घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून त्रास देणे सुरु केले. लग्नानंतर चारच महिन्याने ता. 4 सप्टेंबर 2016 रोजी बहीण मृत्यू झाल्याची माहिती फिर्यादी भावास मिळाल्याने नातेवाईकांनी बहिणीचे घर गाठले होते. मयत बहिणीच्या गळ्याभोवती काळे- निळे व हातातील फुटलेल्या बांगड्या पाहून गळा दाबून जीवे मारल्याचा संशयावरुन पती दत्ता आनंदा तुपेकर, सासरा आनंदा तुपेकर, सासु शोभाबाई तुपेकर, ननंद स्वाती तुपेकर, मुक्ता तुपेकर या पाच जणांविरुद्ध भोकर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलिस निरीक्षक व्ही. के. चव्हाण यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध भोकर जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात तपासण्यात आलेल्या दहा जणांची साक्ष सबळ पुराव्या आधारे आरोपी पती दत्ता आनंदा तुपेकर, सासरा आनंदा तुपेकर, सासू शोभाबाई तुपेकर या तिघांना दोषी ठरवून कलम 304 ब अंतर्गत दहा वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड तसेच कलम 498 मध्ये दोन वर्षे शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT