Ashok Chavan Join Bjp sakal
नांदेड

Ashok Chavan Join Bjp : आता रडायचे नाही, तर लढायचे ; काँग्रेस नेत्यांचा सूर,चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर बैठक

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर गुरुवारी (ता.१५) दुपारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ‘आता रडायचे नाही तर लढायचे’ असा नारा नेत्यांनी दिला.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर गुरुवारी (ता.१५) दुपारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ‘आता रडायचे नाही तर लढायचे’ असा नारा नेत्यांनी दिला. नांदेड शहरातील नवा मोंढा भागातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात प्रदेश पातळीवरील सूचनेवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, पक्षनिरीक्षक युसूफ शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांसह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत या बैठकीत अनेकांनी आश्चर्य व नाराजी व्यक्त केली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर आरोपांच्या फैरी झाडल्या. नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकाही केली. काँग्रेसमध्ये जे घडले ते घडले. आता रडायचे नाही, तर लढायचे. ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण यांनी मोठ्या कष्टातून उभारलेल्या काँग्रेसचा व त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन तत्त्वावर पुढे जायचे असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, पक्षनिरीक्षक युसूफ शेख, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, डॉ. रेखा चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मारोतराव कवळे गुरुजी, अनिल पाटील बाभळीकर, मसूद खान, संजय भोसीकर, अनिल मोरे, बालाजी चव्हाण, प्रफुल्ल सावंत, आनंद चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चव्हाणांवर टीका टाळली

काँग्रेस कार्यकर्त्यांची अवस्था आता ‘इकडे आड तर तिकडे विहीर’ असल्यासाराखी झाली असून कार्यकर्त्यांनी मनुवाद्याला प्रोत्साहन द्यायचे की काँग्रेसची विचारधारा जिवंत ठेवायची, याचाही विचार करायला हवा, असाही सूर या बैठकीतून निघाला. पण यावेळी कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्याचे टाळले.

एकच पक्षनिरीक्षक उपस्थित

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेड येथे तत्काळ चार निरीक्षकांची नेमणूक करून नांदेड काँग्रेस समितीची आढावा बैठक घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला चार निरीक्षकांपैकी केवळ एक निरीक्षक युनूस शेख उपस्थित होते. इतर तीन सदस्य मात्र महाबळेश्वर येथील काँग्रेसच्या शिबिराला गेल्याचे सांगण्यात आले. ‘अशोक चव्हाण यांना पळविणाऱ्या भाजपला पराभूत करा’ असे आवाहन शेख युनूस यांनी कार्यकर्त्यांना केले. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी आम्ही पोरके झालो, अशी भावना व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT