file photo 
नांदेड

राज्यमंत्री डाॅ. विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन- अशोक चव्हाण

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : मराठवाड्यात एक यशस्वी साखर उद्योग म्हणून राज्यात ओळख आसलेल्या भाऊरावच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामालाला उत्साहात सुरूवात झाली. राज्यमंत्री  डॉ विश्वजित कदम यांच्या हास्ते गव्हाणीत मोळी टाकून गुरुवारी यंदाचा गळीत हंगाम सुरुवात झाली.या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सभेत डॉ विश्वजित कदम यांच्या कामाचा विशेष उल्लेख करित सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांचे लवकरच प्रमोशन होईल असे प्रतिपादन केले.त्यामुळे कदम यांच्या समर्थकांत उत्साह निर्माण झाला आहे.

काॅग्रेसमध्ये एक वजनादार नेते व मंत्री म्हणुन अशोक चव्हाण यांची ओळख आहे.दोन वेळेस त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.त्यांनी कदम यांच्या प्रमोशनाचा विषय काढल्याने या विधानाला एक वेगळे महत्व आहे. राज्यमंत्री म्हणून चांगले काम करित आसलेले कदम यांचे प्रमोशन होऊन कॅबिनेट मंत्री झाल्यास पश्चिम महाराष्ट्रात काॅग्रेसचे बळ वाढण्यासाठी मदत होणार आहे.

गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे शासन आले

गेल्या पाच वर्षात केंद्रात राज्यात काॅग्रेसचे सरकार नव्हते. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे शासन आले. यात काॅग्रेसच्या मोठ्या नेत्यांची व नेत्यांच्या वारसांची मंत्रीपदी वर्णी लागली. या डाॅ विश्वजित कदम यांचा समावेश आहे.काॅग्रेसमध्ये कै पतंगराव कदम यांचे खूप मोठे वजन होते.ते मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धात सतत चर्चिले जात आसता.त्यांनी राज्यमंत्रीमंडळात आनेक महत्वाची  खाते सांभाळले होते.त्यांच्या कार्याचा समृद्ध वारसा डाॅ विश्वजित कदम पुढे नेत आहेत.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री आसतांना काॅग्रेसचे सर्वात जास्त आमदार निवडून आले

भाऊरावच्या यंदाच्या गळीत हंगामाच्या शुभारंभला प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ विश्वजित कदम यांची उपस्थिती होते. त्यांनी आपल्या मनोगतात डॉ कै शंकरराव चव्हाण यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाचा, जलसिंचनाच्या कामांचा विशेष असा उल्लेख केला.तसेच युवक काॅग्रेसच्या राज्यचा अध्यक्ष होण्यासाठी अशोक चव्हाण यांचे विशेष आसे सहकार्य लाभले हे आर्वजून सांगून कृतज्ञता व्यक्त केली .तसेच अशोक चव्हाण मुख्यमंत्री आसतांना काॅग्रेसचे सर्वात जास्त आमदार निवडून आले होते,त्यांनी शेतक-यासाठी कर्जमाफी केल्याचा विशेष आसा उल्लेख कदम यांनी केला.

राज्यमंत्री मंडळातील सर्वात तरुण व सुफरफास्ट मंत्री

माजी मुख्यमंत्री व वर्तमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी डाॅ विश्वजित कदम हे राज्यमंत्री मंडळातील सर्वात तरुण व सुफरफास्ट मंत्री आहेत.विविध विभागाचे राज्यमंत्रीपद चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत आसे कौतुक केले.तसेच कै डाॅ शंकरराव चव्हाण व कै. पतंगराव कदम यांचे चांगले संबंध होते आसे आर्वजून सांगितले.  पश्चिम महाराष्ट्रात कै पतंगराव कदम यांनी शैक्षणिक ,साहित्य आसे विविध क्षेत्रांत भरिव आसे काम केले आहे.तोच वारसा डॉ विश्वजित कदम पुढे नेत आहेत.मुर्ती लहान आसली तरी किर्ती व काम महान आहे आसे श्री चव्हाण  यांनी गौरोदगार काढले. तसेच डाॅ विश्वजित कदम यांचे लवकरच प्रमोशन होईल आसे सांगितले.

काॅग्रेसमध्ये तरुणां आनण्याठी डाॅ कदम यांचा फायदा होऊ शकतो.

डॉ विश्वजित कदम युवक काॅग्रेसचे आध्यक्ष आसतांना राज्यत फिरून युवकांना काॅग्रेसच्या प्रवाहात आनाले आहे.संघटनात्मक काम वाढविले आहे.राज्यमंत्रीमंडळात एक तरुण चहरा आहे.पश्चिम महाराष्ट्रात  शैक्षणिक, सहकार ,उद्योग क्षेत्रात  कदम परिवाचे खूप मोठे योगदान आहे.  काॅग्रेसमध्ये एक वजनादार नेते म्हणून  कै.पतंगराव कदम यांची ओळख होती.त्यांचा वारसा डाॅ विश्वजित कदम पुढे नेत आहेत.त्यांच्या प्रमोशनचा विषय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काढल्याने त्यास एक वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. काॅग्रेसमध्ये तरुणां आनण्याठी डाॅ कदम यांचा फायदा होऊ शकतो. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT