file photo
file photo 
नांदेड

मुलीच्या बदनामीमुळे आईने मरणाला कवटाळले; भोकर तालुक्यातील प्रकार ः एक आरोपी ताब्यात

बाबूराव पाटील

भोकर ( जिल्हा नांदेड ) ः थेरबन (ता. भोकर) येथील एक तरुण घरी येऊन मुलीला त्रास देत असे. समाजात बदनामी नको म्हणून आईने रविवारी (ता. २८) विषारी औषध घेतले. सोमवारी (ता. २९) उपचारादरम्यान आईने चक्क मरणाला कवटाळले असल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, थेरबन येथील एक नवयुवक मुलीच्या प्रेमात पडला. याची पुसटती कल्पना तीच्या घरच्या मंडळीस मिळाल्याने तीच्या कुटुंबीयांनी मुलीचे हात पिवळे करण्याच्या निर्णय घेतला. ही बाब त्या तरुणाला कळताच मुलीच्या घरी जाऊन मानसीक त्रास देणे सुरु केले. मुलीच्या आईने मुलास वारंवार समजावून सांगितले तरी तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आता समाजात आपली बदनामी होईल या भीतीपोटी आईने मागील रविवारी (ता. २८) घरीच विषारी औषध प्राशन केले. भोकर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले असता सोमवारी (ता. २९) उपचारादरम्यान आईची प्राणज्योत मावळली. 

मुलीच्या कुटुंबीयांनी मरणास कारणीभूत असलेल्या मंडळीस अटक करा अन्यथा अत्यंवीधी करणार नाही असा पवीत्रा घेत मृतदेह सोमवारी (ता. २९) येथील पोलिस कार्यालयात आणल्याने एकच खळबळ उडाली. संतप्त जमाव आणि पोलिस यांच्यात बराच काळ चर्चा झाल्यावर यावर तोडगा निघाल्याने रात्री उशिरा अत्यंविधी करण्यात आला आहे. मयताच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी लक्ष्मण गोविंद चव्हाण, श्रुषीकेश गोविंद चव्हाण, प्रफुल्ल गोविंद चव्हाण, गोविंद लक्ष्मण चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन एकास ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील तपास करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT