विजय चव्हाण, तहसीलदार 
नांदेड

Motivational Story : ऊसतोड मजुराचा मुलगा झाला तहसीलदार

कंधार तालुक्यातील पानशेवडी हे गाव तसं आडमार्गाचं. त्याला लागून गणा तांडा. ऐंशीच्या दशकात जेथे दोन वेळा खायची सोय नव्हती तिथं. घरात लाईट कुठून येणार.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याचा अनुभव आता वाडी तांड्यासह आदिवासी पाड्यावरही येतो आहे. पिढ्यानपिढ्या ज्याच्या कुटुंबात भटकंती होती. या ऊसाच्या फडातून त्या ऊसाच्या फडात. थंडी, उन्ह, पावसाची पर्वा न करता जगण्याचा व लेकरं जगविण्याचा " संघर्ष' पिढीला पुंजलेला होता..भाकरीचा "अर्धचंद्र" शोधण्यात जिंदगी गेली. असा कुटुंबाच्या 'कुळीचा " उद्धार झाला तो विजय चव्हाण यांच्या शिक्षणामुळे. जेथे कोणत्याही सुविधा नव्हत्या. केवळ गरिबीच, अज्ञान पण या दारिद्र्यावर मात करतात गणा तांडा येथील ऊस तोड कामगारांचा मुलगा विजय लक्ष्मण चव्हाण हे तहसीलदार झाले. आजच्या नेटिझनच्या युगात ' नवी स्वप्न-नवी उमेद' असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश " रोल मॉडेल ' बनले आहे.

कंधार तालुक्यातील पानशेवडी हे गाव तसं आडमार्गाचं. त्याला लागून गणा तांडा. ऐंशीच्या दशकात जेथे दोन वेळा खायची सोय नव्हती तिथं. घरात लाईट कुठून येणार. सोबतीला ' चिमणीचा ( दिवा) "प्रकाश ". गरिबी तशी पाचवीला पुंजलेली. गेनूबाई व लक्ष्मणराव या ऊसतोड कामगार दाम्पत्याच्या गरिबीचा' पांग " फिटला. पिढ्यानपिढ्याच्या दारिद्र्यावर जिद्द, मेहनत व हुशारीच्या बळावर 'विजय " मिळवीत गणा तांड्यावरचा मुलगा 2011 मध्ये एमपीएससी द्वारा नायब तहसीलदार झाला. आणि आता तहसीलदार.

हेही वाचा - बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून करोडो रुपये लुटणाऱ्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली आणि लखनऊ या भागातून अटक करुन त्यांच्याकडून विस लाखाचा मुद्देमाल जप्त. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विजय चव्हाण यांचे पानशेवडी येथे दुसरी तर निवासी आश्रम शाळेत सातवीपर्यन्त आणि माध्यमिक शिक्षण कंधार श्री शिवाजी हायस्कूल येथे झाले. १९९७ मॅट्रिक, १९९९ बारावी त्यानंतर पीपल्स कॉलेज येथे पदवी व स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात एम. ए. इंग्लिश पूर्ण केले. एलएलबी, एलएल एम हे कायद्याचे शिक्षण पूर्ण करणारे विजय चव्हाण यांनी काही काळ पीएसआय म्हणून नौकरी केली व नायब तहसिलदार पदी निवड झाल्यानंतर त्यांनी ती नौकरी सोडली. लोहा, नायगाव, उमरी, बिलोली, मुखेड, नांदेड, कंधार येथे नायब तहसिलदार म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. कंधार व मुखेड नगरपालिका येथे प्रभारी मुख्याधिकारी म्हणूनही विजय चव्हाण यांनी काही काळ काम केले. त्यांची तहसीलदार म्हणून पदोन्नती झाली आहे.

गोरगरीब माणसाच्या कामाला धावून जाणारे आणि लोकाभिमुख प्रशासन करणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. याचा पुन्हा एकदा अनुभव आला. अलीकडच्या काळात थेट तहसीलदार म्हणून लोहा कंधार भागात या दशकातील ते पहिलेच अधिकारी आहेत. लोहा कंधार तालुक्यांची भूमी ही जशी राजकीय खंबीर नेतृत्वाची तशीच ती गुणवंतांची आहे. या भूमीत विजय चव्हाण 'तहसीलदार "झाल्यामुळे आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. आजच्या काळात उपाशीपोटी राहण्या इतकी गरिबी नाही आणि रॉकेलच्या चिमणी खाली ( दिवा) अभ्यास करण्या जोगी परिस्थिती राहिली नाही. पण विजय चव्हाणसारखे अधिकारी त्या परिस्थितीतुन शिकले आणि त्यांच्या यशामुळे' कुळी उद्धारली. आज चणे आहेत आणि दात ही आहेत पण त्याचा फायदा घेणारे बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी आहेत.

येथे क्लिक करा - किनवट तालुक्यातील शिवणीपासून तीन किलोमीटरवर असणारा आदिवासी पाडा विजेविना. कोटेशन भरुनही कनेक्शन देण्यात आले नाही

ज्या काळात "भाकरी" साठी उन्ह-थंडी- वारा याची पर्वा न करता घरापासून कोसोदूर ऊस तोडण्याससाठी जावं लागणाऱ्या गेनूबाई व लक्ष्मण चव्हाण दाम्पत्याचा मुलगा हजारो कुटुंबाला राशन देणाऱ्या "ऑर्डर " वर सही करतो. उकंड्याची दैना फिटली नव्हे तर ती बदलण्याचे काम विजयरावांनी केले अथक परिश्रम, जिद्द, गरिबीची जाणीव ठेवून यशाला गवसणी घालणाऱ्या विजय चव्हाण हे होतकरु, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थिती बदलू शकणाऱ्या जिद्दी विद्यार्थ्यांसाठी " प्रेरणादायी आहेत. या भूमीला नेहमीच सार्थ अभिमान वाटावा अशी कामगिरी गोदा- मन्याडचे भूमिपुत्र प्रशासकीय पातळीवर काम करीत आहेत. अनेक जण मेहनत गरिबीतून मोठ्या पदावर जात आहेत. त्याची प्रेरणा नव्या पीढीसाठी' नवी उमेद होय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT