file photo 
नांदेड

खासदार चिखलीकर यांना धक्का; जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून बाद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी बुधवारी (ता. तीन) मोठी कलाटणी मिळाली. बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे निवडणुकीसाठी पुन्हा सज्ज होत असताना निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांनी त्यांच्या विरोधात दाखल झालेला आक्षेप मान्य केल्याने त्यांना निवडणूक रिंगणातून बाहेर जावे लागले आहे.

जानापुरी सेवा सहकारी सोसायटीकडून संस्था प्रतिनिधी म्हणून खासदार चिखलीकर यांच्या नावाचा ठराव पाठविण्यात आल्यानंतर दोन वर्षापासून संस्थेचे सभासद नसून शेतकरीसुद्धा नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला. सुनावणीच्या वेळेस दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी खासदार चिखलीकर हे सभासदत्वासाठी पात्र ठरत नाहीत असा निर्णय दिल्याने चिखलीकरांच्या अपात्रतेची जिल्हाभर चर्चा होत आहे.

सहकारी संस्थेचे सभासद नव्हते, ते शेतकरीही नाहीत. गेल्या दोन वर्षापासून त्या संस्थेचे सभासद नाहीत. त्यामुळे त्यांचे सभासदत्व रद्द करुन संबंधित सचिव व चेअरमन यांच्यावर कारवाई करण्याची विनंती नितीन गिरी यांनी केली आहे. याबाबत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका लोहा यांच्या अहवालात संस्थेच्या विधीनुसार संस्थेच्या सभासदाकडे किमान दहा गुंठे जमीन आवश्यक असून सभासद तेथील रहिवासी असणे गरजेचे आहे. 

या पात्रतेनुसार संस्थेने प्रतापराव पाटील हे ठराव तारखेवर वाजेपर्यंत संस्थेच्या उपविधीत निकाल संस्थेचे सभासद म्हणून सातबारा व इतर कागदपत्रे कार्यालयात सादर करु शकले नाहीत. त्यामुळे संस्थेचे सभासद प्रतापराव पाटील यांचे नाव बँकेच्या अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत सभासद या विषयी कागदपत्र पडताळणी होणे गरजेचे वाटते असे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे खासदार चिखलीकर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीही अपात्र ठरले आहेत.

बँकेच्या इतिहासात खासदार पदावर असलेल्या व्यक्तीला बँकेच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याचे बहुदा ही पहिलीच वेळ असावी, त्यामुळे हा विषय राजकीय चर्चेचा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT