file photo 
नांदेड

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी- सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शासनाच्या निर्देशानुसार 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 45 वर्षांवरील सर्व अधिकारी- कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, अशी विनंती सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी केली आहे.

महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अखंडपणे राबत आहेत. त्यासाठी त्यांना सातत्याने घराबाहेर फिल्डवर कार्यरत रहावे लागते. यातून अनेकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, यासाठी महावितरण प्रशासन प्रयत्न करत आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या आठही जिल्ह्यांतील महावितरणच्या 45 वर्षांवरील सर्व अधिकारी- कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा. 

यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलाच्या मुख्य अभियंत्यांना उचित कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. याबाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाशी समन्वय साधून 45 वर्षांवरील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे तसेच या कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन लसीकरणाचा अहवाल प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT