file photo 
नांदेड

मुदखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; दोन दिवसात सहा जणांना घेतला चावा

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून या कुत्र्यांनी भर वस्तीमध्ये मोठा धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांमध्ये सहा जणांना चावा घेऊन लचके तोडले आहेत. यामुळे पाच जणांची परिस्थिती गंभीर असून या पाच जणांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे समजते.

मुदखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरु झाला असून काल व आज दोन दिवसांत एकूण सहा जणांना चावा घेतला असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. पालिकेकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. चावा घेतलेल्या सहापैकी पाच जणांना गंभीर चावा घेतल्याने त्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मुदखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. कुत्र्याने सहा जणांना चावा घेतला. पैकी पाच जण गंभीर असून प्राथमिक उपचारानंतर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल जाधव यांनी बोलताना सांगितले. कुत्र्यांने चावा घेऊन जखमी झालेल्या नागोराव संभाजी वलदे (वय ६५), रोहन संतोष टाकळे (वय सहा), श्रीकांत खरात (वय २६), सोहन बाबू साकरेकर (वय पाच) या चार जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. ता. २८ रोजी नवी आबादी भागांतील शे. अमन शे. वसीम (वय १२) व शे. अमर शेख अमजद (वय चार) या दोघांना जखमी केले आहे.

 या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वारंवार सांगण्यात येऊन सुध्दा पालिकेकडून टाळाटाळ का करण्यात येते हे न उलगडणारे कोडेच आहे. मुदखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल जाधव यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांचेकडे कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेल्या सहापैकी चारजण कोवळी बालके आहेत. खरोखरंच पालिका या मोकाट कुत्र्यांचा व गुरांचा बंदोबस्त करण्यात रस दाखवेल काय असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT