प्रशांत पाटील सीओ 
नांदेड

मुदखेडचे सीओ कापरे इंदापूर तर त्यांच्या जागी वडवणीचे प्रशांत पाटील

त्या अनुषंगाने शुक्रवारी ( ता. २१ ) मुदखेड पालिकेचा पदभार नूतन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वीकारला आहे. नूतन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांना वडवणी नगरपंचायतच्या कामकाजाचा एक वर्षाचा तर माजलगाव नगरपालिकेचा तीन महिन्याच्या कामकाजाचा अनुभव असल्याचे समजते.

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे ( Co Ramjaje kapre) यांची प्रशासकीय कारणावरुन पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपालिकेत बदली (Indapur nagarparishad) करण्यात आली असल्याचे आदेश नगर विकास विभागाचे अवल सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या स्वाक्षरीने बुधवारी (ता. १९) मे काढण्यात आले आहेत. तर मुदखेड नगरपालिकेचे नूतन मुख्याधिकारी म्हणून बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायत येथून प्रशांत पाटील यांची शासनाने येथे नियुक्ती केली आहे. (Mudkhed's- CO- Kapare- Indapur- replaced- by Vadvani's- Prashant- Patil)

त्या अनुषंगाने शुक्रवारी ( ता. २१ ) मुदखेड पालिकेचा पदभार नूतन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी स्वीकारला आहे. नूतन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांना वडवणी नगरपंचायतच्या कामकाजाचा एक वर्षाचा तर माजलगाव नगरपालिकेचा तीन महिन्याच्या कामकाजाचा अनुभव असल्याचे समजते.

हेही वाचा - डोळ्यांत दोन थेंब टाकल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत ऑक्सिजन पातळी 83 वरुन 95 पर्यंत वाढते, असा या औषधाचा जलवा आहे.

मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी मुदखेड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे जून २०१८ मध्ये हाती घेतली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी येथील नगरपालिकेचा कारभार जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व शहरवासीयांना विश्वासात घेऊन यशस्वीपणे सांभाळला होता.

त्यांच्या कार्यकाळात शहरात पाणीपुरवठा योजना, बैल बाजार येथील पाण्याच्या टाकीचा प्रलंबित प्रश्न व मारोती मंदिर परिसरात प्रलंबित असलेले काम त्यांनी मार्गी लावले. कोरोना काळामध्ये देखील त्यांनी कुशलतेने शहरातील परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हाताळली होती. एक कुशल युवा मुख्याधिकारी म्हणून त्यांनी येथील पालिकेचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळला असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या बदलीच्या निमित्ताने दिली.

नागरिकांच्या प्रलंबित कामांना प्राधान्य देणार- मुख्याधिकारी पाटील

मुदखेड पालिकेचा पदभार मी स्वीकारला असून माझ्या कार्य काळामध्ये मुदखेड पालिकेमध्ये मुदखेड शहरवासीयांची असलेली प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याचे सकाळशी बोलताना नूतन मुख्याधिकारी प्रशांत पाटील यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT