nanded sakal
नांदेड

Nanded News : मुखेड मतदारसंघात भगवा फडकणार

वायकर : शिवसेना आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

मुखेड : शिवसेना (उबाठा) पक्षाची आढावा बैठक शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालय लोखंडे चौक येथे पार पडली. यावेळी मुखेड कंधार विधानसभेवर भगवा फडकणार असे प्रतिपादन या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक शिवसेना नेते तथा माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी केले. या वेळी शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार, माजी आमदार रोहिदास चव्हाण, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर, विधानसभा संपर्क प्रमुख संदेश दिघे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख बालाजी पाटील शिंदे, उपजिल्हा प्रमुख महेश पाटील, देगलूर विधानसभा प्रमुख नागनाथ वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीचे आयोजन शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथ लोहबंदे आणि तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे यांनी केले असून येणाऱ्या काळात तालुक्यात गाव तिथे शाखा बनवणार आणि येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवनार असे आश्वासन दोन्हीही पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय बेळीकर, भालचंद्र नाईक, माजी उपजिल्हाप्रमुख वसंत संबुटवाड, किसान सेना जिल्हाप्रमुख शंकर पाटील लुट्टे, युवासेनेचे सुनिल पाटील कदम, तालुकासंघटक शंकर पिटलेवाड, बालाजी आप्पा पसरगे, शिवाजी गेडेवाड, बालाजी बंडे, उपतालुकाप्रमुख मन्मथ खंकरे, विजय मंगलगे, शाम शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदिप पिल्लेवाड यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT