file photo 
नांदेड

नांदेड जिल्ह्यात दोन हजार एकरवर होणार तुतीची लागवड  

अभय कुळकजाईकर

नांदेड - उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तसेच त्यांना शेतीतून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कृषी संलग्न असलेला तुती लागवड व्यवसायाला प्राधान्य देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. या योजनेअंतर्गत २०२१ - २०२२ या वर्षात जिल्ह्यातील दोन हजार एकरवर तुती लागवडीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी (ता. सहा) दिली आहे. 

रेशीम उद्योगास जिल्ह्यातील वातावरण पोषक आहे. त्यामुळे या रेशीम उद्योगाला वाव मिळावा यासाठी २०१६ - २०१७ पासून जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत तुती लागवडीची योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक लाभार्थ्यास तीन वर्षासाठी तीन लाख २० हजार रुपये अनुदान कुशल व अकुशल माध्यमातून देण्यात येते. 

१६ तालुक्यांना लागवडीचे उद्दिष्ट 
या योजनेअंतर्गत २०२० - २०२१ अखेर जिल्ह्यातील १४८ गावात ७०६ शेतकऱ्यांनी ८३३ एकर क्षेत्रावर एक लाख वीस हजार सहाशे अंडीपुंज घेऊन ८० हजार ५२९ किलोग्राम एवढे कोषाचे उत्पादन घेतले आहे. या कोषांची विक्री पूर्णा (जि. परभणी) येथे होत असल्यामुळे भविष्यात या उद्योगाला चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील १६ तालुक्यांना दोन हजार एकरवर (आठशे हेक्टर) तुती लागवडीचे उद्दिष्ट ठरविले आहे. 

तुती लागवडीचे नियोजन
जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत अनुदान मिळत असल्यामुळे २०२१ - २०२२ मध्ये जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियान अंतर्गत (मनरेगा मार्फत) तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत जिल्ह्यात दोन हजार एकरवर तुती लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या बाबत नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी जिल्हा रेशीम अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतावर अभ्यास दौरे आयोजित करून निवड केलेल्या शेतकऱ्यांना आत्मा अंतर्गत प्रशिक्षण द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : जिल्ह्यात आतापर्यंत बँकानी शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्जाचे केले वाटप 

तालुकानिहाय लागवडीचे लक्षांक 
नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा, कंधार, धर्माबाद, किनवट, हदगाव या आठ तालुक्यात प्रत्येकी ७५ हेक्टर तसेच देगलूर, मुखेड, बिलोली, माहूर, हिमायतनगर व भोकर या सहा तालुक्यात प्रत्येकी दहा हेक्टर तसेच उमरी व हदगाव या दोन तालुक्यात प्रत्येकी ७० हेक्टर लागवडीचे लक्षांक देण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT