भाच्यांनी केला मामीचा खून
भाच्यांनी केला मामीचा खून 
नांदेड

कौटुंबीक वादातून भाच्यांनी केला मामीचा खून; नायगाव तालुक्यातील घटना

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : दारुच्या नशेत असलेल्या दोन भाच्यांनी मामीला केलेल्या (Naphuwe) मारहाणीत मामीचा जागीच मृत्यू ( death) झाल्याची घटना रविवारी (ता. १६ )रोजी सायंकाळी तालुक्यातील धानोरा (Naigaon dhanora) येथे घडली. मयत महीलेच्या मुलींनी दिलेल्या तक्रारीवरुन सदर प्रकरणी रविवारी रात्री उशिरा रामतीर्थ पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Mummy murdered by nieces over family dispute; Incidents in Naigaon taluka)

शांताबाई किशन जाधव यांच्या घरी त्यांचे दोन भाचे करण शंकर भांगे रा. गडगा ह. मु. बोळेगाव ता. बिलोली व जेजेराव केरबा भंराडे बामणी ता.बिलोली हे (ता. १६) रोजी सायंकाळी दारु पिऊन आले. दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी सुरुवातीला मामीकडे आमच्यासाठी जेवन करा असे फर्मान सोडले. त्यानंतर कौटुंबिक विषयाला हात घालून मामीसोबत वाद घातला. त्यावेळी मामीने दारुच्या नशेत असलेल्या दोन्ही भाच्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुन्हा शिविगाळ केली. यामुळे संतापलेल्या मामीने इथून चालते व्हा असा दम भरताच जेजेराव भंडारे याने मामीला पाठीमागून धरले तर करण भांगे याने हातातील कड्याने डोक्यावर वार केले.

हेही वाचा - परभणीतील येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेने पुढाकार घेत संस्थेला ४० हजार रुपयांचे किराणा सामान भेट स्वरुपात दिले आहे

या मारहाणीत शांताबाई या बेशुध्द पडल्याने मुलगी शितल हिने आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी धावून आले व सदरच्या घटनेची माहिती रामतीर्थ पोलीसांना दिली. मामी बेशुध्द पडलेली आणि गावकऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्याने दोन्ही भाचे पळून जात होते पण गावकऱ्यांनी दोघांनाही पकडून झाडाला बांधून ठेवले होते. रामतीर्थ पोलिस घटनास्थळी धाव घेवून शांताबाई जाधव यांना रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर प्रकरणी मयत शांताबाई किशन जाधव यांची मुलगी शितल गुलाब सुर्यवंशी रा. नरसी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन भाच्यांनी किरकोळ कारणावरुन मामीसोबत वाद घातला असला तरी या गावात वेगळीच चर्चा असून दोन्ही आरोपींचा वेगळाच विचार होता असे बोलल्या जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT