file photo 
नांदेड

बालिकेचा खून : वडिल, काका आणि आजोबाना कोठडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मुलीचा जन्म झाल्यानंतर पती- पत्नीत वाद होऊन घटस्फोट झाला. मुलीच्या जन्मानंतर सदरची माता आपल्या मुलीला सासरी सोडून माहेरी निघून गेली. आईविना वाढलेल्या मुलीचा खून तिचे वडील, काका,आजी आणि आजोबा यांनी मिळून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मयत बालिकेचा वडिल, काका आणि आजोबा या तिघांना अटक केली असून बिलोली न्यायालयाने या तिघांनाही ता. २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

बिलोली शहरात ता. २० जुलै रोजी छोटी गल्ली भागात एका चौदा वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याचे तेथील काही नागरिकांनी बिलोली पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोदं करण्यात आली. मात्र या मृत्यूद्दल पोलिसांना संशय येत होता. या घटनेचा तपास पोलीस हवालदार माधव वाडेकर यांनी पोलिस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला. या बालिकेचा खून तिच्या घरच्या लोकांनी केल्याची शास्वती तपासादरम्यान आली. मयत बालिका नगमा मौला सय्यद (वय १४) हिची आई ती जन्मताच नवऱ्यासोबत घटस्पोट घेऊन निघून गेली होती. ही बालिका आपल्या वडिलाकडेच राहिली, हळूहळू मालिका आज १४ वर्षाची झाली.

खात्री पटल्यानंतर त्यांनी तिच्या वडिलाला ताब्यात घेतले

पोलिस हवालदार माधव वाडेकर यांनी तपासात सर्व माहिती जमा केली. खात्री पटल्यानंतर त्यांनी तिच्या वडिलाला ताब्यात घेतले. त्यानंतर हा खरा प्रकार समोर आला. वडील सय्यद मौलाना सय्यद अफजल, काका सय्यद बुर्‍हाण सय्यद अफजल, आजोबा सय्यद अफजल सय्यद बुरान आणि आजी हनिफा अफजल सय्यद या सर्वांनी मिळून तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मयत बालिकेच्या नातेवाईकांमध्ये खळबळ पसरली. पोलिसांनी या तिघआंना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा हवालदार माधव वाडेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

ता. २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्याकडे देण्यात आला. पोलीस उपाधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ यांनी पण घडलेल्या घटनेची तपासणी करुन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ता. २३ जुलैच्या मध्यरात्रीनंतर सय्यद मौलाना त्याचा भाऊ सय्यद बुर्‍हाण आणि वडील सय्यद अफजल या तिघांना पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी अटक केली. गुरुवारी (ता. २३) दुपारी बिलोली न्यायालयासमोर हजर करून तपासासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचा मुद्दा मांडल्यानंतर बिलोलीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बालिकेचा खून करणाऱ्या तिच्या घरच्या मंडळींना ता. २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT