file photo 
नांदेड

कंधारमध्ये विवाहितेचा गळा आवळून खून; पतीसह तिघांना पोलिस कोठडी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अॅटो खरेदीसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी नेहमी मारहाण करणाऱ्या पती व सासरकडील मंडळींनी विवाहितेचा स्कार्पने गळा आवळून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी बहादरपुरा (ता. कंधार) येथे घडली. उत्तम मरीबा कांबळे यांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी (ता. एक) पतीसह तिघांना अटक करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यातील पानभोसी येथील दुर्गा उत्तम कांबळे (वय 21) बहादरपूर येथील ज्ञानोबा नागोराव गायकवाड यांच्याशी काही वर्षापूर्वीच लग्न झाले होते. दुर्गाला एक मुलगी आहे. दोन महिन्यापूर्वी माहेराहून पैसे घेऊन ये असा तगादा पतीसह सासरकडील मंडळींनी लावला होता. यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जायचा.

अखेर पती, सासरा व दिराने संगनमत करुन दुर्गाचा गळा आवळून खून केला. या प्रकरणात ज्ञानोबा नागोराव गायकवाड (वय 22), नागोराव गायकवाड वय 42 ) आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यांना अटक केली. कंधार पोलिसांनी या तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. तपास पोलिस निरीक्षक एस. जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCAला उशिरा जाग, व्हीआयपींना सेवा देणाऱ्या देशातील १४ विमान कंपन्यांचं ऑडिट; यादी आली समोर

आपका क्या रेट है! प्रसिद्ध गायिकेला विचारला अश्लिल प्रश्न, तिने पायातली चप्पल काढली अन्....

Latest Marathi News Live Update : आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर राज्य सरकारने करावी कठोर कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Accident : सिल्लोड तालुक्यात भीषण अपघात; उभ्या ट्रकला दुचाकीची जोराची धडक, बिअरबारवर काम करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू

Hapus Mango Price : कोल्हापूर, सांगली मार्केटला हापूस आंबा दाखल, ६०० रुपयांना एक आंबा; हंगामात उच्चांकी भाव

SCROLL FOR NEXT