नायगाव खून 
नांदेड

शेतीच्या वादावरुन सख्या चुलतभावाचा खून; नायगाव तालुक्यातील घटना

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन टेंभुर्णी (ता. नायगाव) येथील रामराव दिगंबर वडजे व त्याचा सख्खा भाऊ नागनाथ दिगंबर वडजे यांच्यात शेतीच्या मोजणी वरुन वाद होता.

चंद्रकांत सुर्यतळ

बरबडा ( जिल्हा नांदेड) : शेतीच्या वादातून झालेल्या (Nanded farm dispute)हाणामारीतील एकाचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. १९) दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. ही घटना टेंभुर्णी (ता. नायगाव) येथे ता. १७ मे रोजी घडली होती. जखमीला नांदेडच्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात (Naigaon police station) भावकितील पाच जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन टेंभुर्णी (ता. नायगाव) येथील रामराव दिगंबर वडजे व त्याचा सख्खा भाऊ नागनाथ दिगंबर वडजे यांच्यात शेतीच्या मोजणी वरुन वाद होता. ता. १७ मे रोजी शेतात मोजणीसाठी दोघांचे कुटुंबीय गेले असता त्यांच्यात वाद झाला. व या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी काठी, दगडांनी नागनाथ दिगंबर वडजे (वय 34) याला मारहाण झाल्याने यात त्याला जबर दुखापत झाली. तसेच संदीप दिगंबर वडजे हाही जखमी झाला. संदीप वडजे यांच्या फिर्यादीवरुन नायगाव पोलिसात ता. 17 मे रोजी आरोपी माधव रामराव वडजे, बालाजी रामराव वडजे, प्रकाश रामराव वडजे,शिवाजी रामराव वडजे व रामराव दिगंबर वडजे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - “गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार”साठी पुढे या- डॉ. विपीन इटनकर

मारहाणीत नागनाथ वडजे यास जबर मार असल्याने ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे प्राथमिक उपचार करुन विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून उपचार चालू असताना बुधवारी (ता. १९) मेच्या दुपारी तीन वाजता त्याचा मृत्यू झाला. या दाखल गुन्ह्यात पुन्हा आता खूनाचा गुन्हा लावण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ करत आहेत.

याच गावात मागील महिण्यात अशाच एका वादातून सख्या भावाने आपल्या भावाचा खून केला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दुसरा खून झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT