नांदेड

नाम फाऊंडेशनचा मदतीचा हात

शेतकऱ्यांना मिळाला आधार; शाळकरी मुलींना सायकलीचे वाटप

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यभरातील शेतकरी या ना त्या कारणाने निराश होऊन आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यानंतर त्यांचा परिवार उघड्यावर येतो. तेव्हा अशा उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे हे ‘नाम’च्या माध्यमातून मदतीसाठी येत आहेत. गेल्या अडीच वर्षात नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाचशेहून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत केली आहे.

नाम फाऊंडेशनतर्फे मराठवाड्याचे विश्‍वस्त म्हणून राजाभाऊ शेळके काम पाहत आहेत. त्यांच्या मदतीला जिल्ह्याचे समन्वयक म्हणून डॉ. अशोक बेलखोडे तर जिल्हा संघटक म्हणून पीपल्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बालाजी कोंपलवार काम पाहत आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हाभरातून आलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांकडून मदतीसाठी हाक येताच त्यांची माहिती मिळवणे व मिळालेली माहिती योग्य असल्यास त्यांची मदतीसाठी नाम फाऊंडेशनकडे शिफारस करण्याचे काम अगदी निष्ठेने करत आहेत.

सुरुवातीच्या काळात सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील २४४ तर तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते १६० शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंची आर्थिक मदत केली गेली. त्यानंतर कोरोना कालावधीत देखील जवळपास १२५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नाम फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. या शिवाय नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक तलाव आणि नद्यांमधील गाळ काढणे व नदीपात्र स्वच्छ करणे, लॉकडाउन दरम्यान गरजवंत शेतकरी व कामगारांना जवळपास शंभर क्विंटल गहू, तांदुळ, डाळीचे वाटप करण्यात आले आहे.

शिवाय विधवा शेतकरी महिलेच्या शेतीची नांगरणी, वखरणी मोफत करुन देणे, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील पाचशे शाळकरी मुलींना सायकलीचे वाटप, दिवाळीच्या निमित्ताने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींना साडी चोळी देऊन त्यांची दिवाळी साजरी करण्यात आली आहे.

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात दिला जातो. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे योग्य नाही. आत्महत्येपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांनी आई - वडील आणि कुटुंबाचा विचार करावा, असे केल्यास कुणाच्याही मनात आत्महत्येचा विचार येणार नाही.

-डॉ. बालाजी कोंपलवार, जिल्हा संघटक, नाम फाऊंडेशन, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT