file photo 
नांदेड

मुक्रमाबादेत संचार बंदी नावालाच; बढ्या सावकारांची दुकाने चालू अन् गरीबांची बंद

विनोद आपटे

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : कोरोनाचा वाढता प्रर्भाव पाहून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी (ता. २५) पासून जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश दिले. पण मुक्रमाबाद येथे या आदेशालाच पायदळी तुडवत बढे व्यापारी हे आपली सर्वच दुकाने बिनधिक्कतपणे रोजच्या प्रमाणे दुकाने उघडी ठेवल्यामुळे परीसरातील असंख्य नागरिकांची तोब्बा गर्दी होत आहे. शहरात येत असलेल्या नागरिकांच्या तोंडावर मास्क नाही. सुरक्षित अंतर नसल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावला आहे. पण ज्यांचे पोट हातावरचे आहे. ते, माञ आपल्यावर कारवाई होईल या भितीने आपली छोटी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असल्यामुळे फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाप्रशासनाने दिले असतानाही शहरात सर्वच दुकाने उघडली जात आहेत. कोरोनाचा धोका ओळखा व जिल्हाधिकारी यांच्या संचार बदी आदेशाचे पालन करून घरीच सुरक्षित रहा. असे पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही  येथील व्यापारी माञ आपली दुकाने ही चालूच ठेवत असल्यामुळे  शेजारीच असलेल्या कर्नाटक, तेंलगाना राज्यातील व परीसरातील जवळपास ४० खेड्यातील नागरिकांचे जत्थेच्या जत्थे हे खरेदी व विक्री करण्यासाठी शहरात बिनधिक्कतपणे येत आहेत. येथील व्यापाऱ्यांना व नागरिकांना कोरोनाचे कसलेच गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. 

एकाही नागरिकांच्या तोंडाला मास्क नाही की, सोशल  डिस्टडिंग पाळत नसल्यामुळे कोरोनाचा धोका अधिकच बळावला आहे. ज्याचे हातावरचे पोट आहे अशाची  पान टपरी, हॉटेल, फळ-भाजी, इस्त्री, मोची, फुलारी, ज्युस सेंटर, रसवंतीगृह यांची दुकाने कारवाईच्या भितीने पुर्ण बंद आहेत. पण जीवनाश्यक वस्तूची दुकाने नसतानाही कोण कशी कारवाई करतात ते.पाहू म्हणून मोठे व्यापारी माञ आपली सर्वच दुकाने चालू ठेवल्यामुळे गरीब माञ हताश झालेला आहे.  गुरुवार (ता. २५) रोजी मुक्रमाबाद येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. पण यांचे गांभीर्य प्रशासनाला आहे ना येथील नागरिकांना  रोजच्या प्रमाणे तोंडाला मास्क न घालता सुरक्षित अंतर न ठेवता बाहेर पडत असून सहमुहाने एकञ राहात असल्यामुळे कोरोनाचा धोका अधिक बळावणार आहे. हे, सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. संचारबंदीत आपली दुकाने उघडून बसत असलेल्या व्यापारावर व विनाकारण बाहेर फिरणा-या नागरिकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे सामान्य नागरिकातून बोलले जात आहे.

ग्राम पंचायत पुढाकार घेणे गरजेचे

ग्राम पंचायत सरपंच, उपसंरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी कोरोनाचा वाढता प्रर्भाव पाहाताशहरात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. जीवनाश्यक वस्तू वगळून इतर दुकाने उघडत असलेल्या व्यापाऱ्यावर व मास्क न घालता विनाकारण बाहेर फिरणा-या नागरिकावर कारवाई केली तर कोरोनावर काही प्रमाणात आळा बसेल.

दुकाने उघडणा-या सर्वावरच कारवाई व्हावी

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली जीवनाश्यक वस्तूंची दुकाने नसतानाही करत शहरातील बढे व्यापारी हे, आपली दुकाने उघडी ठेवत आहेत. गरीब माञ कारवाईच्या भितीमुळे घरातच बसून राहात आहेत. आदेशाची  पायमल्ली करणाऱ्या अशा व्यापाऱ्यावर कारवाई करावी व शहरात होत असलेल्या गर्दीवर आळा घालावा अशी नागरिकातून मागणी होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : “अब तुम्हारी खैर नहीं”, हसन मुश्रीफांचा कोणाला इशारा; संजय मंडलिकांच्या पॅनेलवर काय म्हणाले...

Pune News : आईची नजर चुकवून खेळायला बाहेर पडले अन् चार तासानंतर मृतदेहच सापडले; पुण्यात सख्ख्या बहीण-भावासोबत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : लातूरच्या रेनापुर नगरपंचायत निवडणुकीतून ठाकरे सेनेच्या 11 उमेदवारांनी पूर्णपणे माघार

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Viral Video 'नेहा कक्करने टीशर्टवर घातली ब्रा' नेटकरी म्हणाले...'आवरा जरा हिला' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT