nana patole nana patole
नांदेड

नाना पटोले म्हणतात, 'भाजपचा देश विभाजनाचा डाव...'

श्री. पटोले म्हणाले की, भाजपाने बेंबीच्या देठापासून प्रयत्न केला तरी आगामी काळात राज्यात कॉंग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असून, यात कोणतेही दुमत नाही

सकाळ वृत्तसेवा

श्री. पटोले म्हणाले की, भाजपाने बेंबीच्या देठापासून प्रयत्न केला तरी आगामी काळात राज्यात कॉंग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असून, यात कोणतेही दुमत नाही

नांदेड: मराठा-ओबीसी-दलित राजकारण करून देश विभाजन करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे. देशात महागाईचा भडका उडाला असताना त्यांचे मंत्री जनआशिर्वाद यात्रा काढत आहेत. पण त्यांना कुणीही आशिर्वाद देणार नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. कॉंग्रेस पक्षाच्या वतीने व्यर्थ न हो बलिदान-चलो बचाएं संविधान या कार्यक्रमानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सत्कार प्रसंगी ते मंगळवारी (ता.२४) बोलत होते. कुसुम सभागृहात हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त झाला. श्री. पटोले म्हणाले की, भाजपाने बेंबीच्या देठापासून प्रयत्न केला तरी आगामी काळात राज्यात कॉंग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असून, यात कोणतेही दुमत नाही. भाजपाची गोडसे संस्कृती धर्माच्या नावावर जाती-जातींमध्ये भांडणे लावून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख, पक्षाचे सचिव संपतकुमार, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे, समन्वयक विनायक देशमुख, अभय छाजेड, शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT