file photo 
नांदेड

नांदेड : अर्धापुरात 43 ग्रामपंचायतसाठी 1, 058 अर्ज वैध, दहा अवैध, चार ग्रामपंचायती बिनविरोध होणार

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर  (जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या 141 वार्डातील 377 जागांसाठी प्राप्त झालेल्या एक हजार 68 अर्जापैकी एक हजार 58 अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख सोमावारी (ता. चार) असून निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार तर सोनाळा, आमराबाद, आमराबाद तांडा, देळूब खुर्द या गातील जागांसाठी मोजकेच अर्ज आल्यामुळे या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार आहे. तर विरोधी पॅनलचे उमेदवारी अर्ज कसे मागे घेता येईल यासाठी साम, दाम, दंड, भेद नितिचा वापर केला जात आहे. तर काही गावात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून 377 जागांसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाणनी करण्यात आली. यात दहा उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहे. ग्रामपंचायत निहाय जागा छाणनीमध्ये वैध ठरलेले उमेदवारी अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहेत. 

कंसातला आकडा उमेदवारी अर्जांचा आहे. चोरंबा 9 ( 30 ), रोडगी सात ( 15)  ), सोनाळा सात (सात ), चाभरा 11 (36  ), बामणी नऊ ( 27 ), मेंढला खुर्द सात (17) , मेंढला बुद्रूक सात ( 15 ), जांभरुन सात ( 17 ), लहान 13 ( 43 ), आंबेगाव सात ( 26), बेलसर सात ( 32), शाहपूर सात ( 10), बारसगाव नऊ ( 31 ), येळेगाव 13 ( 45 ), आमराबाद तांडा सात (पाच), आमराबाद सात (चार), गणपूर सात ( 33  ), कामठा 13 (59 ), सांगवी सात ( 15 ), मालेगाव 15 ( 69), भोगाव सात (15), उमरी नऊ ( 23), पाटणूर नऊ (27 ), चेनापूर नऊ ( 22 ) लोणी बुद्रूक नऊ ( 43 ), लोणी खुर्द नऊ (18 ), पांगरी सात ( 19 ), सावरगाव नऊ ( 19) ), धामदरी सात (21 ) दिग्रस सात (16 ), दाभड नऊ ( 29 ), शैलगाव बुद्रूक सात ( 26 ), शैलगाव खुर्द सात ( 13 ), पार्डी 11 ( 26 ), पिंपळगाव 11 ( 27 ), देगाव बुद्रूक नऊ (21), शेणी नऊ (32 ), देळूब खुर्द सात (पाच ), देळूब बुद्रूक नऊ ( 28), कोंढा नऊ ( 34 ), निमगाव 11 ( 33), खैरगाव खुर्द व बुद्रूक सात (17), खैरगाव सात (दहा) या प्रमाणे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्राप्त झालेल्या अर्जांची छाणनी करणे हे महत्त्वाचे दोन टप्पे पुर्ण झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवारी (ता. चार) आहे. निवडणुकीचे खरे चित्र सोमवारी स्पष्ट होणार असले तरी दोन पॅनलमध्येच लढती रंगणार आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT