file photo 
नांदेड

नांदेड : १३०९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, ५० टक्के महिलांच्या हाती गावांची दोरी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या १३०९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबधीत तहसील कार्यालयस्तरावर जाहीर झाले. यात पन्नास टक्के सरपंच पदाच्या जागा महिलांसाठी आरक्षीत झाल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर आदीवासी एक हजार १६६ तर अनुसूचित क्षेत्रात (आदीवासी) १४३ ग्रामपंचायती आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबधीत तहसील कार्यलयात झाले. यात अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग व खुला प्रवर्ग असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेल्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एक हजार १६६ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी २२८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव ठेवण्यात आले. 

यात अनुसूचित जमातीसाठी ८२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ३१५ तर खुल्या गटासाठी ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. तर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या १४३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदे अनुसूचित जमाती करिता निश्चित केली आहे. त्यातील ७२ पदे महिलांसाठी निश्चित करण्यात आली आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी जागा आरक्षीत झाल्या आहेत. यामुळे इच्छूकांचा हिरमोड झाल्याचे पहावयास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

Ratnagiri Coconut Prices : सणांच्या तोंडावर नारळाचा दर वाढला; दक्षिणेतील आवक घटल्याने तुटवडा, सुके खोबरे 250 रुपये किलो

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याचा घाट, आदित्य ठाकरेंचा आरोप

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

SCROLL FOR NEXT