लसीकरण 
नांदेड

नांदेड : 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी जाताय; तर जाणून घ्या केंद्र

ता. सहा मेपासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी लसीचा पुरवठा आवश्यक असून सद्या नांदेड जिल्ह्यात (Nanded) पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे (Vaccination center) सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय नांदेड, शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग नांदेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद ता. धर्माबाद, प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर येथे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे (Dr. Balaji shinde) यांनी दिली. लसीची उपलब्धता ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. Nanded: 18 to 44 year olds go for vaccination; So know the center

ता. एक मेपासून 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 860 लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे 901, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे 855, प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा 947, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर 877 येथे असे एकूण चार हजार 440 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. ता. सहा मेपासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरु गोविंदसिंगजी मेडीकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, स्त्री रुग्णालय, शामनगर या केंद्राचा समावेश आहे.

हेही वाचा - परभणी शहरात या रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी मोठ मोठे तीन प्लॅन्ट उभे केले आहेत

ग्रामीण भागात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जनजागृतीसाठी ग्रामीण भागात महाआरोग्य संवाद अभियानाद्वारे प्रचार व प्रसिध्दीसाठी चित्ररथ व विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. याद्वारे ' माझे कुटूंब माझी जबाबदारी ' व ' मी जबाबदार ' ही मोहिम राबविली जात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ताप, कोरडा खोकला‍ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी कांही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरुन स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वत: आणि इतरांमध्ये कमीत- कमी एक मिटर ( 3 फुट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, मास्क वापरणे, श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळा, जेंव्हा आपल्याला खोकला, शिंक येत तेंव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT