Lumpy skin Disease sakal
नांदेड

Nanded : जिल्ह्यातील १९८२ गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा

सव्वा चार लाख पशुधनाचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण १६६ बाधित गावात सद्यस्थितीत एक हजार ९८२ गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर ७४ पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत.

जिल्हा प्रशासनाने बाधित गावासह पाच किलोमीटर परिघातील इतर ८२२ गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत चार लाख १९ हजार १८३ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या ३१ वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकरी व पशुपालक यांना उपाययोजनाची माहिती वेळेत होण्यासाठी विविध माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

पशुपालक व शेतकऱ्यांनी गोठ्यातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठ्यापासून वेगळे करुन त्यांच्यावर तत्काळ औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन पशुसवंर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी घाबरून न जाता बाधित पशुचा वेळेत उपचार केल्यास हा आजार निश्चित बरा होतो.

लम्पी रोगाचा प्रसार हा डास, चावणाऱ्या माश्या, गोचीड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी याद्वारे होतो. या रोगाचा संसर्ग कॅप्रीपॉक्स या विषाणूमुळे होत आहे. लम्पी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सध्या शासनाने पूर्ण लसीकरण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार पशुपालकांनी लसीकरण करुन घ्यावे, पशुमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री क्र. १९६२ वर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT