file photo 
नांदेड

नांदेड : गोळीबार प्रकरणातील आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

संपत गायकवाड

बाऱ्हाळी ( जिल्हा नांदेड ) ः निवळी (ता. मुखेड) शिवारात राष्ट्रीय महामार्गावर भरदिवसा गोळीबार करणाऱ्या गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्या आरोपीला तीन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गोळीबार प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे पोलिस यंत्रणा आरोपीच्या शोधात होती. त्यात पोलिसांना यश आले असून तब्बल २१ दिवसाच्या तपासानंतर देगलूर येथून एका आरोपीला मुक्रमाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी (ता. ३०) त्याला मुखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी सांगितले.

निवळी येथिल युवक तिरुपती रानबा पपुलवाड हा युवक खासगी कामानिमित्त (ता. नऊ) मार्च रोजी सकाळी देगलूर तालुक्यातील करडखेल येथिल मित्रास भेटून परत गावाकडे मोटारसायकलवरुन येत असताना पाठीमागुन पल्सर गाडीवरुन पाठलाग करुन नांदेड- बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील निवळी शिवारातील गणपती मंदिराजवळ गोळी झाडली होती. त्यात तिरुपती पपुलवाड हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्याकडे देण्यात आला होता. पोलिसांनी २० दिवस वेगवेगळ्या दिशेने तपास केल्यानंतर देगलूर येथिल होट्टल बेस गल्लीतुन राजु रामलु मेडपलवार (वय ३७) या आरोपीला अटक केली. या आरोपीसह अजुनही काही आरोपी असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या गोळीबार प्रकरणाचे कारण काय आहे हे अद्याप समजले नाही.

या घटनेचा तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस आधिकारी सचिन सांगळे, मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक कमलाकर गड्डीमे, पोलिस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे आदी करत आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून आरोपीला अटक केल्याबद्दल नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT