नांदेड - आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी बुधवारी महापालिकेत बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.  
नांदेड

नांदेडला कोरोना संसर्गासंदर्भात प्रशासन झाले सतर्क; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा जिल्ह्यातील प्रशासन दक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश बुधवारी (ता. १७) काढले असून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील आपआपली जबाबदारी ओळखून वागावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता फेसबुक आॅनलाइनच्या माध्यमातून नांदेडकर नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. 

महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक
नांदेड महापालिकेत आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी बुधवारी सकाळी शहरातील विविध मंगल कार्यालये आणि कोचिंग क्लासेसचे संचालक यांची महापालिकेत बैठक घेऊन सूचना केल्या. यावेळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच मंगल कार्यालयाचे व कोचिंग क्लासेसचे संचालक, व्यवस्थापक उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी देखील आरोग्य विभागाचा आढावा घेऊन तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. 

अचानक भेटी घेऊन तपासणी करा
नांदेड शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी गर्दी होणाऱ्या स्थळांना संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अचानक भेटी देऊन तपासणी करावी. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित असतील तर संबंधितांवर कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याला उपलब्ध असलेले सर्व व्हेंटीलेटर्स चालू स्थितीत आहेत का?, याची खात्री करावी. कोरोना केअर सेंटरमधील उपलब्ध साधनसामुग्री सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या आहेत. 

नांदेडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
 
मास्क नसेल तर पाचशे रुपये दंड 

सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावला नसेल तर पाचशे रुपये दंड आकारावा. भाजी मंडई तसेच किराणा दुकानदार अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियमित तपासण्या कराव्यात. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या किमान २० जणांचा शोध घ्यावा व त्यांच्या घरातील सर्वांची कोविड तपासणी करावी. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांची बैठक घेऊन त्वरीत उपाययोजना कराव्यात तसेच जनजागृती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT