Nanded sakal
नांदेड

Nanded : प्रशासनाच्या मदतीने दारू, मटका बंद

गावातील अवैधरित्या दारू व मटका बंद करा

प्रभाकर दहीभाते

बरडशेवाळा : येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, मध्यवर्ती बँक, विद्युत उपकेंद्र, पोलिस चौकीसह विविध कार्यालये असून पोलिस कर्मचारी कमी असल्याने मागील काही दिवसांपासून बरडशेवाळा येथे मनाठा पोलिस प्रशासनाची नजर चुकवत लपून छपून सुरू असलेला दारूसह मटका बसस्थानक परिसरात व कवाना पाटीजवळ मोठ्या जोमाने सुरू झाला.

या वेळी गावातील शेकडो महिलांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गावातील सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, पोलिस चौकीचे जमादार, कॉन्स्टेबल यांना त्या ठिकाणी बोलावून मदत मागितली. या वेळी गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान नसताना मिळत असलेली दारू व सुरू असलेला मटका यामुळे होत असलेले परीणाम सांगितले.

आपल्या पोड तिडकीने भावना व्यक्त करीत गावातील तरुण वयातील मुले व्यसनाधीन होत असल्याने गावातील अवैधरित्या दारू व मटका बंद करा अन्यथा आम्हीच नाईलाजाने वेगळा पर्याय निवडणार असल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेतली होती.

आक्रमक झालेल्या महिलांच्या भावना उपस्थितांनी मनाठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना सांगितल्याने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लपून छपून सुरू असलेल्या दारू मटका बंद करण्याचे आश्वासन देत दोन दिवसांपासून तळ ठोकल्याने गावातील दारू मटका बंद झाला असून लपून-छपून विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

Beed: धर्मांतरासाठी कैद्यांवर दबाव, कारागृह अधीक्षकांविरोधात तक्रार; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

fireworks factory blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; सहा जणांचा मृत्यू, चार जखमी!

SCROLL FOR NEXT