file photo 
नांदेड

नांदेड : "खविसं " प्रशासकीय समिती निवडीनंतर आ. श्यामसुंदर शिंदे व शिवसेना यात धुसफूस सुरू

सकाळ वृत्तसेवा

लोहा  (जिल्हा नांदेड) : लोहा तालुका खरेदी विक्री संघाची प्रशासकीय समिती गठीत झाल्या नंतर पहिल्याच " हमीभाव" खरेदी शुभारंभ कार्यक्रमात शिवसेनेने बहिष्काराचे हत्यार उपसले. नवनियुक्त  समितीच्या अभिनंदन फलकावर जिल्ह्याचे शिवसेना नेते खा हेमंत पाटील व जिल्हाप्रमुख आनंद बोढारकर यांचे छायाचित्र नसल्यामुळे तालुक्यातील दोन्ही शिवसेना पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण थेट संपर्क प्रमुखांकडे गेले. आ श्यामसुंदर शिंदे व शिवसेनेतील धुसफूस पाहता यावर पडदा कसा पडतो की शिवसेना आगामी विधानसभेची बांधणी करण्यासाठी रणनिती आखते आहे की काय ? या राजकीय चर्चेला तोंड फुटले (?) असे कळते.

जिल्ह्याचे शिवसेना नेते खा हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहा कंधार मतदारसंघात शिवसेना पदाधिकाऱ्यांची टीम पक्ष संघटन करते आहे. जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, हा मतदारसंघाचा नेहमीच आढावा घेत असतात. खरेदी विक्री संघाच्या नव्याने गठीत झालेल्या प्रशासकीय समितीत मतदार संघाचे शिवसेना नेते बाळासाहेब कऱ्हाळे, तालुका प्रमुख संजय ढोले, संघटक स्वप्नील गारोळे, शहर प्रमुख मिलिंद पवार हे अनभिज्ञ राहिले.

गुरुवारी (ता. ११)  "खविसं " च्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले. त्या कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेवर शिवसेना तालुका प्रमुख ढाले, शहरप्रमुख मिलिंद पवार यांची नावे नव्हती. .'खविसं'.प्रशासकीय समितीच्या अभिनंदन फलकावर खा. हेमंत पाटील व जिल्हाप्रमुख बोढारकर  यांचे छायाचित्र  टाकण्यात आले नाही. ही बाब शिवसेना पदाधिकारी याना खटकली. आ. शिंदे व शिवसेना यांच्यातील धुसफूस उजागर झाली. तालुकाप्रमुख संजय ढोले  यांनी पत्रक काढून  कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार असल्याचे व  या कार्यक्रमाशी आमचा संबंध नाही असे पत्रकाद्वारे जाहीर केले. त्यामुळे कार्यक्रमाकडे एकही शिवसेना पदाधिकारी फिरकला नाही असे लोहा शहर प्रमुख मिलिंद पवार यांनी सांगितले. 

सर्व घडामोडींची खा. हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख बोढारकर यांना माहिती देण्यात आली. जिल्हाप्रमुख यांनी तालुकाप्रमुख ढाले, शहरप्रमुख मिलिंद पवार यांना  योग्य 'त्या"  सूचना दिल्या .शिवसेनेचा विरोध पाहताच आ शिंदे समर्थकांनी ' मनधरणी"  केली पण काही उपयोग झाला नाही. वरून आम्ही "नवख्ये" आहोत अशी पुष्टी जोडण्यात आली. पण आपल्या भूमिकेवर  शिवसेना ठाम राहिलीं.  त्यांच्या  या निर्णयाला जिल्हा संपर्क प्रमुखांनी "पाठबळ " दिले. 

आगामी काळात आ. श्यामसुंदर शिंदे व शिवसेना यांच्यात 'समेट' होईल (?)  की अशीच धुसफूस सुरूच राहील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तूर्तास  सताधारी महाविकास आघाडीत आपल्या पक्षाचे वर्चस्व राहिले पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पवित्रा घेणार असे स्पष्ट संकेत पक्षाने दिले आहेत .शिवसेना वाढली पाहिजे संघटन मजबूत करा  असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत असे शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. याबाबतीत आ श्यामसुंदर शिंदे यांनी लोह्यातील कार्यक्रमात या बाबत कोणतेही भाष्य केले नाही.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT