नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती sakal
नांदेड

Nanded : एकाधिकारशाही मोडून परिवर्तनाला साथ द्या ; खा. प्रताप पाटील चिखलीकर

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकाधिकारशाही असून ती मोडीत काढून युतीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून द्यावे

राजेश नागरे

अर्धापूर : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकाधिकारशाही असून ती मोडीत काढून युतीच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून द्यावे, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मरळक (ता. नांदेड) येथील प्रचारसभेत सभेत रविवारी (ता. २३) केले. भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचे नारळ प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत फुटले असून यंदा परिवर्तन होणार यावर ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.

नांदेड बाजार समितीच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात येत आहे. युतीच्या प्रचाराची पहिली सभा मरळक येथील महादेव मंदिर परिसरात घेण्यात आली.

या प्रचार सभेला खासदार चिखलीकर यांच्यासह खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ नेते धर्मराज देशमुख आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी संभाजीतात्या पावडे होते. पॅनलमधील सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला.

यावेळी श्री. चिखलीकर म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने नांदेड जिल्ह्यात अभुतपूर्व अशी विकासाची कामे सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी सुमारे साडेसहा हजार कोटींचा निधी मंजूर झाला असून कामे सुरु आहेत. नांदेड बाजार समितीसह जिल्ह्यात अनेक वर्षांपासून एकाधिकारशाही सुरू आहे. सामान्य मतदारांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत जसे परिवर्तन घडवून आणले त्याचप्रमाणे बाजार समितीत परिवर्तन करावे असे आवाहन श्री. चिखलीकर यांनी केले.

यावेळी खासदार हेमंत पाटील व आमदार कल्याणकर यांच्यासह इतरांनी मार्गदर्शन करुन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख जाधव, महानगराध्यक्ष प्रवीण साले, आनंद पाटील बोंढारकर, चैतन्य देशमुख, अॅड. किशोर देशमुख, बंडू पावडे, मिलिंद देशमुख, उमेश मुंडे, शंकर मुतखलवार, व्यंकट मोकळे, डॉ. सचिन पाटील उमरेकर, बालाजी पाटील पुणेगावकर, दिलीप कंदकुर्ते, अनिल पाटील बोरगावकर, संतोष क्षीरसागर, बालाजी स्वामी, संजय अंभोरे, बाबुराव हेंद्रे, प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT