file Photo 
नांदेड

नांदेड - अण्णा भाऊ साठे महामंडळ बंद पाडण्याचा राजकीय घाट; सचिन साठे ः अ,ब,क,ड आरक्षण वर्गीकरणासाठी नांदेडला बैठक

शिवचरण वावळे

नांदेड - इतर समाजाच्या अर्थिक उन्नतीसाठी विविध महामंडळ आहेत. तसेच मातंग समाजाला आर्थिक उभारणी देण्यासाठी अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र एका व्यक्तीने महामंडळात घोटाळा केला आणि सरकार अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ बंद पाडून मातंग समाजाच्या आर्थिक नाड्या आवळण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप सचिन साठे यांनी केला.

, , , , आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात बैठकीच्या निमित्ताने सचिन साठे गुरुवारी (ता.१९) नांदेड दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना वरील माहिती दिली. पुढे बोलताना श्री. साठे म्हणाले की, देशात आजपर्यंत न मोजता येणारे अनेक घोटाळे झाले. मग ते सर्व विभाग बंद झालीत आहेत का? अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात एका व्यक्तीने घोटाळा केला त्याचे समर्थन करणार नाही. मात्र एका व्यक्तीमुळे संबंध मातंग समाजाला महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्ज योजनेपासून दूर लोटले जात असून, त्यामुळे समाजाची अधोगती होताना दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या कोट्यातुन मातंग समाजाला आमदार पदाची अपेक्षा होती

ज्या पक्षाच्या काळात अण्णा भाऊ साठे महामंडळास अर्थिक घरघर लागली त्याच पक्षाने महाविकास आघाडीचे सरकार बनवले आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठे महामंडळाला गतवैभव प्राप्त करुन देत मातंग समाजाला आर्थिक प्रवाहत घेऊन येण्याची नामी संधी असून, त्यांनी समाजाच्या भल्याचा विचार करावा, अन्यथा आम्हाला देखील दिशा बदलावी लागेल असे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नाव न घेता श्री साठे यांनी इशारा केला. राष्ट्रवादी पक्षाच्या पडतीच्या काळात सर्वजन पक्षसोडुन जात असताना मातंग समाजाने पक्षासोबत प्रामाणिकपणे कार्य केले, त्याचे फळ म्हणून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातुन मातंग समाजाला एक पद द्यायला हवे होते.

महाविकास आघाडी सरकारकडून अ, , , . आरक्षणाची अपेक्षा

परंतु इथेही समाजाला उपेक्षित ठेवण्यात आले. मागासवर्गीय समाजाला अ, , , . या वर्गीकरण पद्धतीने आरक्षण मिळाल्यास समाजाच्या शेवटच्या घटकास त्याचा लाभ मिळाले. यासाठी आमची लढाई सुरु असून, महाविकास आघाडी सरकारकडून अ, , , . आरक्षण मिळेल अशी अपेक्षा असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT