file photo 
नांदेड

नांदेड : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणखी 100 बेड 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दररोज एक हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यातील 50 टक्के रुग्णांना घरी दाखल करावयाचे म्हटल्यास नांदेडात कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची चांगलीच हेळसांड होत आहे. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्यक्ष पाहणी करुन जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी या रुग्णालायत परत १०० बेड उपलब्ध करा अशा सुच ना रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत. 

नांदेड शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात एका स्ट्रेचरवर तीन जणांना ठेवल्याचे वृत्त माध्यमातून प्रकाशीत झाले होते. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी गुरुवारी (ता. २५) पाहणी करुन आणखी शंभर बेड वाढविण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे या ठिकाणी आता पाचशे बेड झाले आहेत. नांदेडात कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्यामुळे केवळ अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अत्यवस्थ रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयातील खाटा हाऊसफुल्ल झाल्या आहेत.

विष्णुपुरी येथील रुग्णालयात सध्या दोन वार्ड आणि अपघात विभागात मिळून ३६५ बेड आहेत. परंतु त्यानंतरही एकाच ठिकाणी (बेडवर) रुग्णांना उपचार देण्याची वेळ आली आहे. याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी घेतल्यानंतर रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी १०० खाटांची वाढ केली. आता एकूण पाचशे खाटांची व्यवस्था झाली आहे. अधिष्ठाता डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन रुग्णालयातील इतर समस्या सांगितल्या. रुग्णालयातील स्वच्छता व इतर सोयी सुविधा पाहून जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

आजार अंगावर काढू नका- डाॅ. वाय. एस. चव्हाण 

कोरोना रुग्णाने तातडीने उपचार घेण्याची गरज आहे. उपचारासाठी उशिरा आल्यानंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. अजूनही काही जण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. ही गंभीर बाब आहे. आज घडीला रुग्णालयात दाखल होणाऱ्यामध्ये अनेक रुग्णांनी काही दिवस दुखणे अंगावर काढल्याचे दिसून येत आहे. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT