file photo 
नांदेड

नांदेड : कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रलंबित पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र 11 हजार 500 शेतकऱ्याची सातवी यादी ता. एक जानेवारी 2021 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी सात हजार 681 शेतकऱ्यांनी अद्याप पर्यंत आधार प्रमाणिकरण केले नाही. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार नाही. आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने "महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019" ही 27 डिसेंबर 2019 च्या शासननिर्णयाद्वारे कार्यन्वित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुर्नगठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील ता. 30 सप्टेंबर 2019 रोजी रुपये दोन लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्यावी.

नांदेड जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण दोन लाख 14 हजार 491 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र असुन त्यापैकी बँकांनी दोन लाख सात हजार 36 शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. सदर बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी शासनाने कर्जमाफी पात्र असणाऱ्या एक लाख 94 हजार 216 शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख 86 हजार 535 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केली आहे. आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पुर्ण केलेल्या शेतकऱ्यापैकी एक लाख 79 हजार 628 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम एक हजार 229. 22 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्याच्या खात्यात शासनामार्फत लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

आधार प्रमाणिकरण शिल्लक शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तात्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हा व तालुकास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन तक्रार निकाली काढून घ्याव्यात असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT