file photo 
नांदेड

नांदेड : इयत्ता दहावी, बारावी परीक्षा शुल्क भरणा करण्याचे आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी नोव्हेंबर- डिसेंबर, 2020 साठी आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार असून ते आपण डाउनलोड करुन घ्यावयायचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पद्धतीने बॅक ऑफ इंडियामध्ये भरणा न करता ते एचडीएफसी बँकेत भरणा करण्याबाबतची सुधारीत कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे.

सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी, आरटीजीएसद्वारे चलनावरील नमूद बँक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड HDFC0000007 (एचडीएफसी सहा वेळा शुन्य सात) प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.

असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे

माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी / आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अकाउंट नंबर व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील. तसेच माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रिया होणार नाही याची दक्षता सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी घ्यावयाची आहे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT